plasma
plasma 
मुंबई

कोरोनावरील उपचारासाठी मुंबईत नव्या उपचारपद्धतीला सुरुवात

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारची परवानगी मिळाल्याने पालिकेने या पद्धतीने उपचार करण्यास सुरूवात केली आहे. नायर रुग्णालयात गंभीर रुग्णांवर या थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जाणार आहेत. 

प्लाझ्मा थेरपीसाठी पालिकेने कोरोना आजारातून बरे झालेल्या तीन रुग्णांकडून प्लाझ्माचे तीन युनिट मिळवले आहेत. या उपचारासाठी पात्र ठरणाऱ्या कोरोना रुग्णांवर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.  प्रक्रियेसाठी लागणारी प्लाझ्मा फेरेसिस मशीन नायर रूग्णालयात उपलब्ध आहे. कोरोनामुक्त झालेल्या 5 जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांचे प्लाझ्मा घेण्याची तयारीही सुरू आहे. गंभीर रुग्णांना या पद्धतीचा लाभ होईल.

दिल्लीमध्ये या थेरपीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यात ही थेरपी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे परवानगी मागण्यात आली होती. परवानगी मिळाल्यानंतर थेरपीला प्रत्यक्षात सुरुवात झाली. राज्यात सध्या केवळ पाच ते सहा टक्के गंभीर कोरोनारुग्ण आहेत. त्यातील काही रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जाणार आहेत.

प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग सध्या प्राथमिक स्तरावर आहे. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यात येईल. प्रयोग यशस्वी झाल्यास इतर रुग्णांवर या थेरपीचा वापर करण्याबाबत विचार करण्यात येईल.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनच्या ताब्यातील जमीन परत मिळवणार ते मोफत वीज अन् उपचार; केजरीवालांच्या देशवासीयांना 10 गॅरंटी

MBBS: खोटी माहिती देत 'एमबीबीएस'ला प्रवेश, तरीही हायकोर्टाने फेटाळली पदवी रद्द करण्याची याचिका; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Eknath Khadse: "मी निवडणूक लढवणार नाही, पण..." राजकीय संन्यासाबाबत एकनाथ खडसे थेटच बोलले

Jitendra Awhad: “सगळ्यांना पाडता मग मुलाला का निवडून आणलं नाही?”, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल

IPL 2024 : KKRच्या खेळाडूवर BCCIने घेतली मोठी ॲक्शन; कारवाईचे कारण अस्पष्ट पण दिली 'ही' शिक्षा

SCROLL FOR NEXT