police fir sakal media
मुंबई

नवी मुंबई : स्पा ओनरकडून खंडणी मागणाऱ्या तीन पत्रकारांवर गुन्हा दाखल

नरेश शेंडे

मुंबई : नवी मुंबईत नेरुळमध्ये हावरेे सेंच्यूरियन मॉलमध्ये (haware centurion mall) असणाऱ्या अवेन्यू स्पा ओनरकडून खंडणीची (extorsion case) मागणी करणाऱ्या तीन पत्रकारांवर गुन्हा दाखल (police complaint) करण्यात आला आहे. विजय संघर्ष मासिक, दत्ता माने आणि सिरज चौधरी अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत नेरुळच्या अवेन्यू स्पा ओनरकडून या तिघांनी २४ हजारांची खंडणी घेतली होती. स्पा ओनर आशिष काळे यांनी याबाबत नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये (Nerul police station) तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात आयपीसीच्या सेक्शन ३८४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Police complaint filed in nerul police station against three culprit in extortion case )

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या तिघा आरोपींनी स्पामध्ये भेट दिली होती. स्पामध्ये महिला स्टाफ कस्टमर्सला अनैतिक व्यवहार करण्यासाठी प्रवृत्त करतात, त्यामुळे आम्ही तुमच्या विरोधात तक्रार दाखल करणार. अशी धमकी या तिघांनी काळेला दिली होती. तसंच, महिन्याला ८ हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी काळेकडे केली. सिराज चौधरी याने महाराष्ट्र क्राईमचा पत्रकार असल्याचं आशिष काळेला सांगितलं होतं. मात्र, स्पा मध्ये कोणत्याही प्रकराचं बेकायदेशीर काम चालत नाही, त्यामुळे मी तुम्हा पैसे देणार नाही, असं काळेनी या तिघांना सांगितलं.

परंतु, त्यानंतरही त्यांनी काळेला धमकावण्याचं सत्र सुरुच ठेवलं. काही दिवसानंतर पोलिसांना या स्पाविरोधात तक्रारी येऊ लागल्या. त्यानंतर पोलिसांना स्पामध्ये धाड टाकून चौकशी सुरु केली. पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळं स्पामध्ये कस्टमर्स येणे बंद झाले. त्यानंतर काळे यांनी तिघांना महिन्याला पैशांचा हप्ता देण्याचं ठरवलं. तिन महिने प्रत्येकी आठ हजार रुपये काळे यांनी खंडणीखोरांना दिले. मात्र त्यानंतर खंडणीची रक्कम वाढवून ९ हजाराची मागणी त्यांनी केली. पण काळे यांनी खंडणी द्यायला नकार दिला.

३ जानेवारीला काळे यांनी तिघांविरोधात नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी की, "स्पा ओनरने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करीत आहेत. प्राथमिक चौकशीनंतर तिघा आरोपींना अटक करण्यात येईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi-Hindi controversy : मराठी शिकत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे मोठे विधान

ITI Courses: ‘आयटीआय’मध्ये सहा नवे अभ्यासक्रम; कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

सायना नेहवालचा घटस्फोट, इन्स्टा पोस्टमधून केलं जाहीर; १० वर्षे रिलेशनशिपनंतर लग्न, ७ वर्षांचा संसार

Satara News :'परतीच्या प्रवासात माउली फलटणमध्ये'; मुक्‍कामस्‍थळी आरतीसाठी गर्दी, पालखीसोबत दोन हजार वारकरी

Lonavala Accident: ट्रकमधील पाइप पडून दोन महिला ठार; पाच जखमी, बोरघाटात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील घटना

SCROLL FOR NEXT