migrants 
मुंबई

लॉकडाऊन : गावी पाठवण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सकाळवृत्तसेवा

मिरा रोड : सध्या संचारबंदीमुळे अनेक परराज्यातील मजूर आपल्या मूळ गावापासून दूर शहारांत अडकले आहेत. अशा गरजू कामगारांना गावाकडे पाठवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एका कामगार नेत्यास भाईंदरच्या नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

संचारबंदीमुळे गेल्या 45 दिवसांपासून हाताला काम नसलेल्या कामगारांना पुरेसे अन्न मिळत नसल्यामुळे आपल्या मूळगावी कुटुंबाकडे जाण्याची ओढ त्यांना लागली आहे. दरम्यान सरकारने परराज्यातील कामगारांना गावी जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच फायदा समाजातील काही असामाजिक तत्वे घेत आहेत. मिरा-भाईंदरमध्ये एका संस्थेच्या माध्यमातून अडकलेल्या कामगारांना गावी पाठवण्याच्या नावाखाली मिरा-भाईंदर कामगार वेल्फेअर संस्था अध्यक्ष चंद्रशेखर जाधव हा पैसे गोळा करीत होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.

या संदर्भात श्रमजीवी संघटनेचे मिरा-भाईंदरचे अध्यक्ष सुलतान पटेल यांच्याकडे विचारणा केली असता या व्यक्तीला आम्ही संघटनेतून काढून टाकले आहे. त्याचा आमच्या संघटनेची कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188,269,271,290 व कोविड-19 कायदा 2020 कलम 51 ब प्रमाणे अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Police handcuffed those who were laundering money in the name of sending them to the village

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

Hockey World Cup: दोनदा आघाडी, पण तरी अखेर चीनविरुद्ध भारताची बरोबरी! पहिल्याच सामन्यात रंगला थरार

Aadhaar Centres Only on Paper: मुळशीतील आधार सेवा केंद्रे केवळ कागदावर; २० पैकी ७ केंद्रे मंजूर ठिकाणीच नाहीत, काहींचा ठाव ठिकाणा प्रशासनालाच नाही

Marathi News Live Updates : रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाला गेलेला तरुण काळ नदीत बेपत्ता

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

SCROLL FOR NEXT