माहुलमध्ये प्रदूषणामुळे नागरिक त्रासले आहेत. esakal
मुंबई

Mumbai Pollution : प्रदूषण,अस्वच्छतेमुळे माहुलकर हैराण

Pollution Problem : कुठलेही प्रश्न लोकप्रतिनिधींनी मार्गी लावले नाहीत ; मतदान करायचे की नाही? असा नवमतदारांचा प्रश्न

जीवन तांबे - सकाळ वृ्त्तसेवा

Chembur : रासायनिक कंपन्यांतून होणारे प्रदूषण, अस्वच्छता, पायाभूत सुविधांचा अभाव या समस्यांमुळे माहुलवासीयांचा जीव टांगणीला लागला आहे. आतापर्यंत आमचे प्रश्न लोकप्रतिनिधींनी मार्गी लावले नाहीत. केवळ आमची मते मागायला ते येतात; पण प्रश्न कोण सोडवणार, असा सवाल माहुलचे संतप्त नागरिक करीत आहे.

चेंबूर येथील वाशी नाका, माहुल गाव परिसरात टाटा पॉवर, बीपीसीएल, एचपीसीएलसारख्या पेट्रोलियम कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून सतत विषारी वायू हवेत मिसळत आहेत. यामुळे श्वसनाचे विकार, दमा, त्वचा काळी पडणे, पोट दुखणे, बुरशीजन्य आजार, डोळ्यांची जळजळ आदी आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चेंबूर, मानखुर्द, ट्राम्बे परिसरातील नागरिकांना त्यांची झळ पोहोचत आहे.

माहुलमध्ये एमएमआरडीए प्रशासनाने विविध भागांतील प्रकल्पग्रस्तांसाठी इमारती बांधल्या आहेत; मात्र या इमारती म्हणजे नवा कोंडवाडा असल्याचे इथे राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. या भागात अजूनही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे नागरिकांनी सांगितले.

विषारी वायू, दुर्गंधी, दूषित पाणी, वायुप्रदूषणामुळे जीव मुठीत घेऊन जगत आहोत, असे येथील रहिवाशांनी सांगितले. या परिसरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य सुरक्षित नसल्याचे हरित लवाद आणि न्यायालयाने मान्य केले आहे. प्रशासन मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक आल्यावर उमेदवार मते मागतात, आश्वासन देतात; मात्र न्याय कुणी मिळवून देत नाही, असा सूर माहुलवासीयांमधून उमटत आहे.

मतदान करायचे की नाही?

कित्येक वर्षांपासून प्रदूषणाची समस्या आहे. वायुप्रदूषणामुळे माझ्या वडिलांना आजार जडला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कुणी आमच्या मदतीला आले नाही. या वेळी मतदान करायचे की नाही, असा प्रश्‍न निर्माण होते, असे मत नवमतदार अनिल पांडे याने व्यक्त केले.

ज्येष्ठांसह मुलांची काळजी घेणे गरजेचे

माहुल परिसरात सध्या हवा दूषित आहे. त्याचा परिणाम लहान मुले ते ज्येष्ठ नागरिकांवर होत आहे. दमा, त्वचेवर डाग अशी विविध लक्षणे दिसायला लागली की लागलीच डॉक्टरांकडे जावे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉ. सविता यादव यांनी सांगितले.

खासदार, आमदार पावसासारखे येतात आणि जातात. आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत. आमचे कुठलेही प्रश्न अद्याप मार्गी लावले नाहीत. त्यामुळे मतदान कुणाला करायचे, असा प्रश्न आहे.

- हरुण मुळशी, स्थानिक रहिवासी

एमएमआरडीए वसाहत समस्यांचे माहेरघर आहे. या परिसरात पुनर्वसन करून आमचा कोंडवाडा केला आहे. कोणतेही उमेदवार आमच्या कामाचे नाहीत.

- राजश्री कदम, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar Card: आधार कार्ड कुठे आणि कशासाठी वापरले ते कळणार; नवीन अॅपमुळे काम सोप होणार, प्रक्रिया काय?

Ichalkaranji Muncipal : इचलकरंजीत भाजपची कसोटी; नवे-जुने संघर्षामुळे निवडणूक रंगात

पोरींनो या क्षेत्रात येऊ नका... गौतमी पाटीलचा तरुण मुलींना सल्ला; म्हणाली, 'मला सिद्धार्थ जाधवने सांगितलेलं की...

Night Milk Benefits: हिवाळ्यातील आरोग्याचं गुपित! हिवाळ्यात रात्री दूधात साखरे ऐवजी गुळ मिसळून प्यायल्याने दूर होतात 'या' 4 समस्या

Latest Marathi News Live Update : मुंबई नागपूर हायवेवर भिषण अपघात, तिघे जागीच ठार, दोन जण गंभीर..

SCROLL FOR NEXT