मुंबई

संजय राठोड यांची झाडाझडती, राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश ?

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : पूजा चव्हाण अपमृत्यू प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली असल्याचे समजते. काल सायंकाळी सात वाजता राठोड यांना वर्षावर बोलावून घेण्यात आले होते. तरुणीच्या मृत्यूप्रकरणाभोवती उभे झालेले वादळ तसेच कडक लॉकडाऊनच्या काळात पोहरादेवी मंदिरात केलेली गर्दी लक्षात घेता आता पायउतार व्हा असे सांगण्यात येणार असल्याची माहितीय समोर येतेय. 

मंत्रिमंडळातील सहकारी सुभाष देसाई, एकनाथ शिंदे,  अनिल परब तसेच शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, खासदार विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्याशी  गेले दोन दिवस यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संपर्क ठेवून होते. हा निर्णय घेतला तर शिवसेनेला आपल्याच मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची गरज वाटते पण सहकारी मंत्र्यांची नाही, असे चित्र निर्माण होईल. ही बड्या मंत्र्यांकरवी  भूमिका मांडली गेली होती. मात्र भाजपने पेटवलेले वातावरण आणि जनक्षोभ लक्षात घेता राजीनामा घेणे अपरिहार्य आहे अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली असल्याचं समजतंय. 

"चुकले 'हे' मान्य पण आपल्या मंत्र्यानेच त्याग का करावा ?"

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इशाऱ्यावरून घेणे योग्य नाही. धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाले असल्याने त्यांनीही दोन पावले मागे यावे अशी भूमिका सेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी घेतली असल्याचे समजते. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीत यासंबंधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निर्णय घेताना सर्व बाजुंचा विचार करावा असे सेना नेत्यांनी सुचवले आहे. 

pooja chavan death case cm may ask minister sanjay rathod to resign any time

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT