मुंबई

घ्यायला गेले गहू, रेशन दुकानदाराने विकली बांधकामातील खडी; यावर कुणाचं लक्ष आहे का ?

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मानखुर्दच्या पी एम जी पी वसाहत परिसरातील नागरिकांना खडीची भेसळ केलेले धान्य रेशन दुकानावरून वितरीत केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळी या परिसरातील नागरिकांनी रेशन दुकानावरून आणलेल्या गव्हामध्ये बांधकामामध्ये वापरण्यात येणारी खडी आढळून आली. एकीकडे संचारबंदीमुळे बेरोजगारीची भीती सतावत आहे तर दुसरीकडे कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आवाहन सरकार करत आहे. या परिस्थितीत हे भेसळीचे धान्य खाऊन रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू झाली. त्यामुळे कित्येकांचा रोजगार बुडाला व उपासमारीची वेळ आली. रेशनवर स्वस्तात उपलब्ध असलेल्या धान्यामुळे काही अंशी ही समस्या मार्गी लागली आहे. रेशनवर मिळणाऱ्या धान्यामध्ये कचरा व खडे असतातच, त्यामुळे हे धान्य निवडून मगच खाण्याची सवय गरिबांच्या अंगवळणी पडली आहे.

स्वस्तात मिळत असल्यामुळे कोणतीही तक्रार न करता भेसळयुक्त धान्य ते नेहमी खातात. कोरोनामुळे भीतीच्या वातावरणात जगत असलेल्या या नागरिकांच्या नशिबाचे भोग काही संपताना दिसत नाहीत. आजवर धान्यातून खडे काढून खाणारयांच्या धान्यात चक्क बांधकामात वापरली जाणारी खडी आढळली आहे.

खडी मिसळून मापात पाप केली जात असून त्यामुळे वाट्याला कमी धान्य येत आहे. आधीच हाताला काम नाही त्यामुळे जास्तीत जास्त दिवस धान्य पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यात आणखी धान्य कमी मिळाल्यावर कसे जगायचे हा प्रश्न त्यांना पडत आहे. या प्रकारामुळ गरिबांच्या गरिबीची थट्टा केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

poor people are getting wheat with construction stones read fill story about rationing scam

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Mumbai Airport: मुंबईतून परदेशात जाणाऱ्या 'त्या' प्रवाशांना आता नवी मुंबई गाठावी लागणार? १२ कंपन्यांचा विरोध का?

Maharashtra Live News: जालना जिल्ह्यातील भिलपुरी गावात पोहोचले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vivekanand Patil Gokul Politics : आम्हाला चोरमन नको, आमच्या हक्काचा चेअरमन हवा; गोकुळच्या मोर्चात विवेकानंद पाटील यांची आक्रमक तोफ धडाडली

SCROLL FOR NEXT