nagpur vidhan bhavan.jpg 
मुंबई

दिवाळीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात येत्या 7 डिसेंबरपासून सुरू होईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. परंतु, हे अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीत खरेदीसाठी वाढलेली गर्दी आणि कोरोनाची वाढलेली रूग्णसंख्या विचारात घेऊन सरकार निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. 

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ७ डिसेंबरपासून हिवाळी आधिवेशन सुरू होणार होते. मात्र कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता सत्ताधारी पक्षाने हिवाळी आधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार सुरू केला आहे.

यापूर्वी आमदार विकास ठाकरे यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग आणि अपुऱ्या आरोग्य सुविधा या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन रद्द करावे. अधिवेशनासाठी लागणारा निधी कोरोनाच्या आरोग्य सुविधांसाठी करावा, अशी मागणी केली होती.  नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान करोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात ‘निगेटिव्ह प्रेशर’ची सोय करण्यात आल्याचे नाना पटोले यांनी सांगितले होते. त्यामुळे विधिमंडळ सदस्यांचा कोरोनापासून बचाव होऊ शकतो, असेही ते म्हणाले होते. 

दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना आकडेवारीचा विचार करून अधिवेशन घ्यायचे की पुढे ढकलायचे याबाबत विचार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli RTO : वाहनधारकांना नाही शिस्त; ‘आरटीओ’ची वसुलीवर भिस्त; गतवर्षी २५ हजार कारवाया; ५ कोटी रुपयांची दंड वसुली

Viral News : प्राणी पाळत असाल तर सावधान ! कुत्र्याशी फक्त एक मिनिट खेळली महिला, नंतर अन् हात अ्न पाय कापावे लागले, नेमकं काय घडलं ?

Sanju Samson Struggle Story: बंदे में है दम...! संजू सॅमसन, आपला माणूस अन् त्याच्या पाठी खंबीर उभी राहणारी चारुलथा...

Vishwajit Kadam : राज्यातील प्रश्नांवर सरकारला जाग कधी?; आमदार विश्वजित कदम : विधानसभा अधिवेशनात सरकारला धारेवर धरले

Latest Marathi News Live Update : खामेनेई यांच्या हत्येविरोधात काश्मीरमध्ये दुसऱ्या दिवशीही निदर्शने

SCROLL FOR NEXT