मुंबई

जंबो कोविड केंद्रातही लवकरच पोस्ट कोविड ओपीडी; कोरोनानंतर गुंतागुंत झालेल्या रुग्णांसाठी योजना

भाग्यश्री भुवड

मुंबई, 25 : कोरोनानंतर गुंतागुंत झालेल्या रुग्णांसाठी लवकरच पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात येणार आहे. नेस्को जम्बो कोविड केंद्रात ही पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात येणार असुन किंग एडवर्ड मेमोरियल ( KEM ) आणि आर.एन. कूपर रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स या रुग्णांच्या आरोग्यात तयार झालेल्या गुंतागुंतीकडे लक्ष देणार आहेत. याबरोबरच कोविडोत्तर पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचीही या केंद्राची योजना आहे, जिथे फुफ्फुसांचा व्यायाम आणि फिजिओथेरपीवर विशेष लक्ष दिले जाईल. ज्यासाठी, केंद्र आवश्यक उपकरणे खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. 

नायर दंत वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि जंबो सेंटर प्रभारी डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले की, केंद्रातील कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्याने त्यांनी पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुन्हा आलेल्या रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी मनुष्यबळाचा उपयोग केला जाणार आहे. "आम्हाला आढळले की बराचशा कोविड रुग्णांना आरोग्याशी संबंधित इतर समस्या होत आहेत. त्यामुळे, आम्हाला त्यांच्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ज्यासाठी आम्ही ओपीडी तत्त्वावर रूग्णांना तपासण्यासाठी केईएम आणि कूपर रूग्णालयाच्या तज्ज्ञांना बोलवण्याच्या विचारात आहोत."

बरेच बरे झालेल्या कोविड -19 रूग्णांमध्ये  दीर्घकाळापर्यंत राहणारी गुंतागुंत तयार झाली आहे. जसे की श्वास, थकवा, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, फुफ्फुसातील फायब्रोसिस, हृदयरोग आणि इतर अवयवांमध्ये सुन्नपणा. यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार देखील पडतो कारण रुग्णांना अनेक महिने उपचार घ्यावे लागतात. 

याव्यतिरिक्त, सौम्य आणि मध्यम कोविड-19 संक्रमित रूग्णांना जंबो कोविड केंद्रात कोविड -19 नंतर पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची योजना आखत आहे. ज्यामध्ये फुफ्फुसांशी संबंधित व्यायाम आणि फिजिओथेरपीचा समावेश असेल. ज्यात रुग्णांना मोफत उपचार दिले जातील. 

असे केंद्र जलद गतीने रुग्णांना बरे व्हायला मदत करेल आणि गरीब लोकांना हे उपचार परवडतील, असे सांगत आरोग्य क्षेत्रात या निर्णयाचे स्वागत केले आहे. “कोविड 19 चा रुग्णांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतो. परंतु पुनर्वसन कार्यक्रमांच्या अभावामुळे बरेच गरीब लोक त्यातून बाहेर नाहित.

आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याच्या वाढत्या घटनांचा विचार करता कोविड 19 नंतरच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर सरकारने लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे, ”असे आरोग्य कार्यकर्ते डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

post covid symptoms will be treated at jumbo covid center and other covid hospitals in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT