मुंबई

एकही शब्द नाही, तरीही संवेदनशील परिस्थितीत बळ देणारा एक 'खास' व्हिडीओ पाहा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण देश  एकत्र आहे असा संदेश सतत राज्य आणि केंद्र सरकारकडून देण्यात येतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. जनतेला सुरक्षेबाबत आश्वस्त करण्यासोबतच आरोग्य सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांचं, पोलिसांचं आणि सफाई कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य उंचावण्याचं कामही उद्धव ठाकरे करत आहेत.

आता कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य विभागातले कर्मचारी, पोलिस आणि स्वच्छता विभागातले कामगार यांचं  मनोधैर्य वाढवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे. 'आपण लढणार आणि आपण जिंकणार' असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातले प्रमुख शहरं ओस पडली आहेत. मात्र आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस,पोलिस, सफाई कर्मचारी हे आपलं कर्तव्य चोखपणे पार पडत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून,वेळ आली तर उपाशी राहून हे लोकं आपली ड्युटी करत आहेत.आता याच सगळ्या लढवय्यांचं मनोधैर्य वाढवणारा हा व्हिडीओ समोर आणला आहे. कोरोनाच्या विरोधातली लढाई जिंकायचीच आहे हा निर्धार करा असं या व्हिडीओच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सांगत आहेत.  या व्हिडिओमध्ये एक संवाद वापरण्यात आला नाहीये . तरीही हा व्हिडीओ अत्यंत प्रेरणा देणारा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रेरणादायी शब्दांचा हा व्हिडीओ शिवसेनेतर्फे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ संवाद किंवा कोणाचा आवाज नसतानाही खूप काही सांगून आणि शिकवून जातोय असं म्हणायला हरकत नाही.

a powerful video will boost your moral during corona crisis watch video

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : खवळलेल्या समुद्रामुळे अद्याप संकट कायम; यंत्रणा ‘अलर्ट’, हवामान विभागाचा इशारा काय?

Telangana Police : दीड कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात माओवादी बंडी प्रकाश पोलिसांना शरण; 45 वर्षांपासून माओवादी संघटनेत होता सक्रिय

'तो जेव्हा सेटवर यायचा तेव्हा...' अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी सांगितला सलमानसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या...'तेरे नामच्या शुटवेळी...'

IND A vs SA A: रिषभ पंत कर्णधार; रजत पाटीदार, आयुष म्हात्रे Playing XI मध्ये! उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीसाठी असा असेल भारताचा संघ

Trimbakeshwar Crime : त्र्यंबकेश्वर खून प्रकरणाला नवे वळण! गुराख्याच्या अटकेनंतरही नातलगांचा पोलिसांवर संशय; बांधकाम व्यावसायिकासह चौघांविरुद्ध तक्रार

SCROLL FOR NEXT