vadala vitthal mandir 
मुंबई

यंदाच्या आषाढी एकादशीला 'प्रति पंढरपूर'चे होणार दर्शन ऑनलाईन... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा विठ्ठल मंदिरात या वर्षी आषाढी एकादशी उत्सव साजरा होणारा नाही. दरवर्षी वडाळा विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी मोठा उत्सव आणि जत्रा आयोजित केली जाते. मुंबईतील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षी कोरोना संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी वडाळा विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्सव होणार नसून ठराविक विश्वस्त सदस्य आणि पूजारांच्या उपस्थित आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईची पूजा होईल. भक्तांना विठ्ठलाचे फेसबुक आणि युट्यूबद्वारे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त उदय दिघे यांनी दिली. 

श्री विठोबा गणपती महादेव मंदिर (प्रति पंढरपूर वडाळा) विश्वस्तांची नुकतीच बैठक पार पडली. कोरोनाचा धोका लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन नागरिकांना घेता येणार नाही. प्रथेप्रमाणे विठ्ठल आणि रखुमाईची पूजा व अभिषेक होईल. यावेळी मंदिराच्या ट्रस्ट काही मोजकेच विश्वस्त उपस्थित असतील. या पूजेचे लाईव्ह दर्शन नागरिकांना प्रतिपंढरपूर वडाळा फेसबूक पेजवर आणि युट्यूब घेता येणार आहे. तसेच आषाढी एकादशीचा उत्सव व जत्रा कार्तिकी एकादशीला (शासनाच्या निर्देशाप्रमाणे ) आयोजित करण्यात येईल, असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. 

आषाढी एकादशी ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही ते वडाळा मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच या ठिकाणी मुंबईतून अनेक दिंडीही येतात. मंदिराचा परिसर आदल्यादिवशीपासून गजबजलेला असतो. आदल्यादिवशी पासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. मुंबईमध्ये अजूनही या भागात जत्रा भरवली जाते. त्यामुळे या दिवशी या परिसराला गावच्या जत्रेचे स्वरुप येते. 

दिंडी सोहळा रद्द 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाचा दिंडी सोहळा रद्द करण्याचा निर्णय गिरगाव येथील गिरगाव वारकरी संप्रदायाने जाहीर केला आहे. दर वर्षाप्रमाणे येत्या 21 जून रोजी रविवारी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्याचा विचार होता, परंतु देशातील कोरोनाचे थैमान पाहता दिंडी सोहळा आयोजित करणे शक्य नसल्याची माहिती आयोजक विशाल श्रीमणी यांनी सांगितले. मुंबई व उपनगरातून जवळपास चारशे वारकरी या सोहळ्यात सामील व्हायचे, यंदा घरात राहून कोरोनाला हरवूया आसे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT