RPF sakal media
मुंबई

महिला RPF ची कौतुकास्पद कामगीरी; गरोदर महिलेला वेळेत केले रुग्णालयात दाखल

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेवरून (central railway) एक गरोदर महिला प्रवासी (pregnant woman commuter) लोकलने प्रवास करत होती. लोकल डोंबिवली येथे आली असता, महिलेला प्रसुती वेदना (delivery paining) होऊ लागल्या होत्या. यावेळी इतर महिला प्रवाशांनी डोंबिवली स्थानकात (dombivali station) कर्तव्यावर असलेल्या महिला आरपीएफला याबाबत माहिती दिली. त्यानंतर महिला आरपीएफ दुर्गेश आणि भावना यांनी संबंधित गरोदर महिलेला डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर येथील महापालिका रुग्णालयात (bmc hospital) दाखल केले. त्यानंतर या महिलेला मुलगा झाला. महिला आरपीएफ जवानांच्या योग्य कार्यवाहीमुळे, सजगतेमुळे महिलेची प्रसुती वेळेत झाली. त्याबाबत समाज माध्यामावरून महिला आरपीएफ विभागाचे कौतुक केले जात आहे.

सोमवारी, (ता.8) रोजी सकाळी 6 च्या सुमारास मध्य रेल्वेवरील खडवली रेल्वे स्थानकातून केईएम रुग्णालयात जाण्यासाठी गरोदर महिला इफ्तियार अंसारी (29) लोकलने प्रवास करत होती. प्रसुतीबाबतच रुग्णालयात जात होती. मात्र, लोकलने प्रवास करत असताना, डोंबिवली स्थानकात महिलेला प्रसुती वेदना होऊ लागल्या. परिणामी, लोकल डब्यातील इतर महिलांनी रेल्वे स्थानकातील महिला आरपीएफ विभागाला कळविले.

त्यानंतर महिला आरपीएफ दुर्गेश आणि भावना तेथे दाखल होऊन गरोदर महिलेला त्वरीत रिक्षा बसवून शास्त्रीनगर येथील महापालिका रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डाॅ. काजल शाहद्वारे गरोदर महिलेला एडमिट करून अत्यावश्यक सेवा दिली. त्यामुळे महिलेला मुलगा झाला. महिला आणि नवजात बाळाचे आरोग्य ठणठणीत असल्याची माहिती आरपीएफ विभागाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT