मुंबई

वाह, कमाल आहे! मेट्रोची धाव मिठी नदीखालून तसेच वरुनही...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः महापुरामुळे मुंबईकरांना जास्त माहिती झालेली मिठी नदी खालून तयार झालेल्या बोगद्याच्या कामानंतर आता नदीवरुन पूल बांधण्याची तयारी सुरु झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरण मिठी नदीबरोबरच वाकोला नाला तसेच वांद्रे कुर्ला संकुलात पूल बांधण्यासाठीही तयारी सुरु केली आहे. 

मुंबई महानगर विकास प्राधीकरणाच्या मेट्रो 2 मार्गावर हे तीन पूल आहेत. डीएन नगर ते मंडाले या मार्गावरील या तीन पूलांसाठी 180 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मिठी नदीवरील पूल 120 मीटर लांबीचा असेल, तर वाकोला नालावरील 80 मीटर तर वांद्रे कुर्ला संकुलातील 73 मीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. त्यासाठी 28 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याचा कालावधी 11 जून ते 27 जुलै दरम्यान कागदपत्रे अपलोड करण्याचीही सूचना देण्यात आली आहे. या प्रोजेक्टच्या निविदा सादर करणाऱ्यांसाठी 2 जुलैला बैठकही होणार आहे. त्यावेळी पूलाबाबतचे सादरीकरण करण्यात येणार आहे.  डीएन नगर ते मंडाले या मार्गावरील मेट्रो 23.643 किमी धावणार आहे. त्यासाठी मेट्रो एलिवेटेड  कॉरिडोर तयार होत आहे. या मार्गासाठी एकंदर 10 हजार 968 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

कुलाबा वांद्रे सीप्ज मार्गावर धावणारी मेट्रो 3 साठी मिठी नदीच्या खालून बोगदा तयार करण्यात आला आहे. तो जवळपास पूर्ण झाला आहे. एकंदर 22 स्थानके असलेल्या डीएन नगर - मंडाले या मेट्रो मार्गावरील युटिलीटी वर्क 28.86 टक्के झाले आहे. या मार्गावर इंटरचेंज सुविधाही उपलब्ध असेल. या लाईनला डीएन नगर येथे घाटकोपर - वर्सोवा मेट्रोला जोडण्यात येणार आहे. कुलाबा - वांद्रे - सीप्ज मार्गावर चालणारी मेट्रो चेंबूरला मोनो रेलला तर पूर्व द्रूतगती महामार्गावर मेट्रो चारला जोडण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये NDRF दाखल; पूर-दरड संकटासाठी बचाव पथक सज्ज

SCROLL FOR NEXT