मुंबई

मुंबईत सध्या 34 हजार ऍक्टिव्ह रूग्ण, तब्बल 1200 रूग्ण गंभीर 

मिलिंद तांबे

मुंबई, ता.20 : मुंबईतही कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी मुंबईत केवळ 34 हजार 136 ऍक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील 8376 रुग्णांना कोणतीही लक्षणे नाही मात्र त्यातील 1233 रूग्ण हे गंभीर आहेत.

मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 18 सप्टेंबरपर्यंत मुंबईतील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही 1,80,534 इतकी आहे. त्यातील 1,37,664 रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर 34,136 रूग्णांवर पालिकेच्या विविध कोविड केअर सेंटर तसेच रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.

मुंबईतील मृत्यूदर हा 5 टक्क्यांवर पोचला असून आतापर्यंत 8372 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ऍक्टिव्ह रूग्णांपैकी 71 टक्के म्हणजे 24527 रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर 25 टक्के रुग्णांना म्हणजेच 8376 रुग्णांना लक्षणं जाणवत असून त्यांनी प्रकृती स्थिर असल्याची मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. 

  • मुंबईत 9 वर्षाच्या आतील 3205
  • 10 ते 19 वयोगटातील 6359
  • 20 तो 29 वयोगटातील 24714
  • 30 ते 39 वयोगटातील 31874
  • 40 ते 49 वयोगटातील 31964
  • 50 ते 59 वयोगटातील 34501
  • 60 ते 69 वयोगटातील 24229
  • 70 ते 79 वयोगटातील 12600
  • 80 ते 89 वयोगटातील 4177
  • 90 ते 99 वयोगटातील 0452

तर शंभर वर्षांवरील केवळ 1 रूग्णांची कोरोना बाधित म्हणून नोंद झाली आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

at presently there 34 thousand active covid patients in mumbai out of them 1200 are critical

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT