covid testing 
मुंबई

 अरे वाह ! मुंबईत कोरोना चाचणीचे दर झाले कमी; जाणून घ्या 'हे' आहेत नवे दर...  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाच्या चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये 4500 रूपये एवढे शुल्क आकारले जाते.  मात्र सर्वसामान्यांना हे शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे मुंबईत कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत आकारण्यात येणारे भरमसाठ दर कमी करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने कोरोना चाचणीचे नवे दर निश्चित केले आहेत. 

आटीपीसीआर ही चाचणी कोरोनाच्या निदानासाठी जगात केली जाते. खासगी लॅब्स फक्त अहवालासाठी साडे 4 हजार रुपये शुल्क घेत होते. शिवाय, जर घरी जाऊन चाचणी करायची अस्ल्यास 5 हजार 200 रुपये घेतले जात होते. हे दर आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत एक समिती नेमण्यात आली होती. 

सरकारने नेमलेल्या समितीने 2200 ते 2800 रूपयांपर्यंत दर निश्चित केले असुन तसा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे  यांनी हा अहवाल सरकारला पाठवला आहे. दर निश्चिती बाबत एका आठवड्यात निर्णय घेतला जाणार होता. कोरोना चाचणीचा दर कमी करण्यापूर्वी सर्व खासगी प्रयोगशाळांसोबत वेबिनार बैठक घेण्यात आली. कोरोनासाठी नमुने गोळा करण्यापासून ते चाचणीचा निकाल येईपर्यंत येणाऱ्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. 

असे लागू होतील नवे दर: 

नमुने थेट आरोग्य केंद्रातून गोळा करुन चाचणी करायची असल्यास 2200 शुल्क आकारावे. तसेच जर रुग्णाकडून रुग्णालयात किंवा घरुन सॅम्पल गोळा करायचे असल्यास 2800 रूपये शुल्क आकारले जावे अशी शिफारस डॉ. शिंदे यांच्या समितीने केली आहे. शिवाय चाचणीसाठी लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा जेणेकरून चाचणीचे दर आणखी कमी होतील असे ही या अहवालात नमूद केले आहे. या समितीचा अहवाल सरकारने मान्य केल्यास साडे चार हजारांहून थेट 2200 किंवा 2800 एवढे चाचणीसाठीचे शुल्क आकारले जाऊ शकते. 

"आता कोणाच्या घरी जाऊन जर कोरोना चाचणी करायची असेल तर त्यात प्रवास खर्च वगैरे पकडून 2800 रुपये शुल्क आकारले जाईल आणि रुग्णालयातून नमुने घेऊन रिपोर्ट देण्यासाठी 2200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी चाचणीचे शुल्क आहे. यामुळे आता चाचणीतून होणाऱ्या नफेखोरीला आळा घालणं सोपं होईल", असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हंटलंय.  

price drop for corona testing in mumbai read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण' सिनेमाच्या टीझरची चर्चा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT