मुंबई

मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक सेवानिवृत्तीनंतरही बंगल्यातच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील बंगल्यात निवृत्त प्राध्यापक अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाचे बंगल्याचे लाखो रुपयांचे भाडे थकविले आहे. त्या प्राध्यापकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने केली आहे.

विद्यापीठ निवृत्त प्राध्यापकांवर मेहेरबान झाले असून इतर प्राध्यापकांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. विद्यापीठाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. बी. व्यंकटेश कुमार यांनी मुंबई विद्यापीठाचे लाखो रुपयांचे शुल्क थकविले आहे. सेवा निवृत्तीनंतरही मुंबई विद्यापीठाच्या बंगल्यात ते राहत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंबेडकर स्टुडंट असोसिएशन या संघटनेने जुलै 2019 मध्ये आंदोलन केले.

यावेळी प्रशासनाने संबंधित प्राध्यापकांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन संघटनेला दिले होते. यानंतरही संबंधितांवर कारवाई न झाल्याने संघटनेने विद्यापीठाला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर विद्यापीठाने डॉ. व्यंकटेश कुमार यांना सेवा निवास्थान रिक्त करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. याबाबत विद्यापीठ तातडीने कारवाई करेल, असे लेखी आश्‍वासन कुलसचिवांनी दिले आहे. 

विद्यापीठातील अनेक प्राध्यापक दूरवरचा प्रवास करून विद्यापीठात येतात. हे प्राध्यापक विद्यापीठात सेवानिवास्थान मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत; परंतु त्यांना डावण्यात येत आहे. त्यामुळे घरासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या प्राध्यापकांना तातडीने सेवा निवासस्थान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आंबेडकरी स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मनवाडकर यांनी विद्यापीठाकडे केली आहे. 

web title : Professor of University of Mumbai in his bungalow even after retirement

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather : पुण्यात थंडीला सुरुवात; पाच दिवसांत पारा येणार आणखी खाली

Wardha Crime: प्रेमसंबंधास नकार, तरुणीचा आवळला गळा तरुणीचा अन्...

Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Balasaheb Thorat: जनमत महाविकास आघाडीच्या बाजूनेच: बाळासाहेब थोरात; शिर्डीत महाविकास आघाडीचा मेळावा, निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार

Nagpur Crime: कौटुंबिक वादातून पुतण्याकडून काकाचा खून; पारडीतील घटना, चाकूने वार करीत संपविले

SCROLL FOR NEXT