ठाणे : पर्यटनस्थळे, नदी किनारा, धबधबा येथे पावसाळ्यात होणारे दुर्घटना टाळण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर परिसर तसेच बारवी धरण परिसरात तीन किलोमीटर हद्दीत ४ ते ३१ जुलै या काळात धबधबा परिसरात मद्यपान करणे, धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे, खोल/वाहत्या पाण्यात उतरणे व पोहणे आदी कृत्यांना प्रतिबंध करण्यात आले आहे. या संबंधीचा आदेश अंबरनाथच्या तहसीलदार प्रसांती माने यांनी दिले आहेत. अंबरनाथ (Ambarnath) तालुक्यात कोंडेश्वर हे पर्यटनस्थळ आहे. त्या ठिकाणी शंकराचे मंदिर व धबधबे आहेत. (Prohibition Act Impose In Kondeshwar And Barav Dam Of Area In Thane)
त्याच बरोबर चांदप गावचे हद्दीतील बारवी धरण परिसरातही पावसाळ्याच्या दिवसात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक (Tourist) येतात. काही वेळेस पर्यटक हे मद्यपान करून हुल्लड घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच खोल व वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यामुळे दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोंडेश्वर परिसरातील धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी तसेच चांदप गावच्या हद्दीतील बारवी धरण परिसरातील बारवी नदी, पिंपळोली, आस्नोली, सागाव ते बारवी धरण गेट क्रमांक ३ येथील या परिसराच्या ३ किमी क्षेत्रात खालील कृत्यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. (Thane News)
त्यानुसार पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्य सेवन करून प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्या जागेवर मद्य सेवन करणे. पावसामुळे धोकादायक ठिकाणे धबधबे, दऱ्याचे बंदरे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, पावसाळ्यामुळे वेगाने वाहणाऱ्या धोकादायक पाण्यात / खोल पाण्यात उतरणे व पोहणे, धबधब्याच्या वरील बाजूस जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोता खाली बसणे, धोकादायक स्थिती व जीवितहानी होईल अशा धबधबे किंवा तलाव या ठिकाणी पाण्यात उतरणे, रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहणे थांबवणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहन चालविणे, वाहनाने ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बादल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डि.जे. सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/ ऊफर वाजवणे व त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करणे, धरण/तलाव/धबधब्याचे तीन किमी परिसरात दुचाकी / चारचाकी/ सहाचाकी वाहनांने प्रवेश करणे आदी कृत्यांना प्रतिबंध करण्यात आले असल्याचे तहसिलदार माने यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.