मुंबई

वाहनचालकांना येतोय 'नावे'तून समुद्रसफर केल्याचा अनुभव; अरे, हा तर रास्ता...

हेमंत देशमुख

कर्जत : कर्जत-मुरबाड-शहापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम एमएमआरडीकडून हाती घेण्यात आले आहे. या राज्यमार्गाचे काम मागील तीन-चार वर्षांपासून सुरू आहे. या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात असतानाच सुगवे वारेदरम्यान दापुंदा येथील एका वळणावर बांधलेली संरक्षक भिंत पहिल्याच पावसात कोसळल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

कर्जत-मुरबाड-शहापूर या महामार्गाचे मार्केवाडी ते पादीरवाडीदरम्यान सुरू असलेले काँक्रीटीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. सुरुवातीपासूनच सलग काम न करता ठिकठिकाणी रस्त्याचे खोदकाम करून ठेवले आहे. यातील काही खड्डे अपूर्ण अवस्थेत असताना काँक्रीटीकरण सुरू केले. त्यामुळे वाहतूक करताना आता याचा मोठा त्रास या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या चालकांना सहन करावा लागत होता.

रस्ता चांगल्या दर्जाचा होईल या अपेक्षेने होणारा त्रास सहनही केला गेला. मात्र आज या रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेले दिसून येत आहेत. काही ठिकाणी रस्ता खचलेल्या अवस्थेत असून, रस्त्याचा पृष्ठभाग समतल नसल्याने वाहनचालकांना एखाद्या 'नावे'तून समुद्रसफर केल्याचा अनुभव येत आहे.

रस्त्यावरील काही ठिकाणी मोऱ्या टाकताना खाली कोणत्याही प्रकारचा काँक्रीट न टाकता केवळ मातीवरच मोऱ्या बसविल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे‌. आश्चर्यकारक बाब म्हणजे नवीन रस्त्याला जुन्याच मोऱ्या बसविल्याचा प्रकार कळंब नाक्यावर दिसून आला आहे.

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असून, रस्ता काही दिवसांतच खचत आहे. मोऱ्या टाकताना कोणतेही निकष पाळले गेले नाहीत. केवळ मातीवर मोऱ्या टाकल्याने त्याही खचू शकतात. आमच्या कळंब नाक्यावरही एका ठिकाणी जीर्ण झालेली मोरी टाकण्यात आली आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही ठेकेदार कंपनीने कामाचा दर्जा राखला नसल्याने भविष्यात रस्ता खराब होणार. जनतेचा पैसा वाया जाणार आहे. शासकीय अधिकारी वर्गाने रस्ता दर्जेदार होण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. - शहनवाज पानसरे, राष्ट्रवादी युवा उपाध्यक्ष, कर्जत तालुका

( संकलन - सुमित बागुल )

protective wall on karjat murbad highway collapsed due to heavy rainfall

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT