भिवंडी : हरकती व सूचनांवरील सुनावणीसाठी उपस्थित असलेले मेट्रो प्रकल्प बाधित नागरिक. 
मुंबई

भिवंडी मेट्रो प्रकल्पात विरोधाचे सूर 

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी पालिका कार्यक्षेत्रात प्रस्तावित मेट्रो मार्ग-5 ठाणे-भिवंडी-कल्याण या प्रकल्पातच्या अनुषंगाने पालिकेत प्राप्त झालेल्या 6 हजार हरकती तसेच सूचना अर्जांवर पालिकेच्या नगररचना विभाग व आयुक्तांनी सुनावणी घेतली. या सुनावणीमध्ये शहरातील कल्याण रोड मार्गावर राहणारे रहिवासी व व्यापाऱ्यांनी 6 हजार हरकती व सूचना अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सुमारे 1 हजार 40 नागरिकांनी मेट्रोच्या मार्गास विरोध तर, सुमारे 5 हजार नागरिकांनी या मार्गास सकारात्मक भूमिका दाखविली आहे. 

भिवंडी शहरातील नागरिकांना दळणवळणाचे साधन सुलभपणे व्हावे यासाठी खासदार कपिल पाटील यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने मेट्रो प्रकल्प भिवंडीत राबविण्याचे काम सुरू केले आहे. सध्या मेट्रो मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. ठाण्यातील कापुरबावडी येथून सुरू होणारा मेट्रो रेल्वे मार्ग बाळकूम, कशेळी, काल्हेर, पुर्णा, अंजूरफाटा, धामणकरनाका, राजीव गांधी चौकापासून कल्याण रोडकडे वळण घेऊन पुढे टेमघर, रांजणोली, गोवेगाव, दुर्गाडी ते कल्याणमधील एमपीएमसीपर्यंत नेण्यात येणार आहे. हा मेट्रो रेल्वेमार्ग 24 किलोमीटर लांबीचा असून त्याकरिता 8 हजार 416 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 

भिवंडी शहरातील धामणकर नाका ते कल्याण रोड, गोपालनगर, टेमघर, साईबाबा मंदिर, रांजणोली, कोनगावमार्गे हा मेट्रो मार्ग कल्याणच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएने कापूरबावडी, कशेळी, काल्हेर, पूर्णा, कोपर ते राहणाळ गांवपर्यंत रस्त्यावर काम सुरू केले आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी रस्ता रूंदीकरण केले जाणार आहे. त्यामुळे अनेक दुकाने, इमारती व घरे तोडली जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर भिवंडीतील कल्याण रोड मार्गच्या दुहेरी बाजूला राहणारे बाधित नागरिक व दुकानदार व्यापाऱ्यांनी संघर्ष समिती स्थापन करून कल्याण रोड मार्गाने जाणाऱ्या मेट्रो मार्गाला विरोध दर्शविला आहे. 

महिनाभरात निर्णयाची शक्‍यता 
सदर मेट्रो मार्ग वंजारपट्टी मार्गाने नेण्यात यावा, अशी समितीची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन सरकार व एमएमआरडीएच्या सूचनेवरून भिवंडी पालिका प्रशासनाने मेट्रोबाधित नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यासाठी सुमारे 6 हजार बाधित रहिवाशांना महिनाभरापूर्वी नोटिसा दिल्या होत्या. या नोटिसीवर आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या दालनात लेखी हरकती व सूचना अर्जावर सुनावणी घेण्यात आली. आयुक्तांनी या हरकती व सूचनांबाबतचा गोपनीय अहवाल सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात मेट्रो मार्गाबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT