डाळींनी मारली 'सेन्चुरी'; गृहिणींची चिंता वाढली 
मुंबई

गृहिणींची चिंता वाढवणारी बातमी; डाळींनी मारली 'सेन्चुरी

ok

नवी मुंबई : अवकाळी पावसामुळे या वर्षी अन्नधान्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, बाजारात त्यांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, घाऊक बाजारात अनेक कडधान्य शंभर रुपये किलोच्या घरात पोहचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ सोसावी लागत आहे. किरकोळ बाजारातही कडधान्य १०० ते १२० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. मागील आठ महिन्यांपासून कांदा, भाजीपाला यांच्या वाढलेल्या दराने नागरिक त्रस्त होते. त्यातच आता कडधान्याच्या दरवाढीचा सर्वसामान्यांना सामना करावा लागत आहे.

सर्वसामान्यतः दिवाळीनंतर बाजारात नवीन अन्नधान्याची आवक सुरू होते. त्यानुसार कडधान्याची आवक यावेळी थोड्या उशिराने सुरू झाली. मात्र, त्यांच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेने ३० ते ४० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. तीन-चार वर्षांपूर्वी बाजारात तुरीच्या डाळींनी किलोमागे शंभरी ओलांडली होती. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करून रेशन दुकानात स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून दिली होती. मात्र, आताही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु यावेळी अजूनही स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना महागड्या दरात डाळी आणि कडधान्य खरेदी करावी लागत आहे. यावेळी तूरडाळीचे दर काही प्रमाणात कमी असून, मूगडाळीने मात्र दरवाढीत उच्चांक गाठला आहे. 

अवकाळी पावसामुळे राज्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच कडधान्याच्या आयात शुल्कात वाढ झाली आहे. मागणीइतका पुरवठा होत नसल्याने दर वाढले आहे. हे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.
- सुरेंद्र शहा, व्यापारी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT