तुरुंग, न्यायालयांमध्ये मार्चपर्यंत व्हीसी सुरू करा
तुरुंग, न्यायालयांमध्ये मार्चपर्यंत व्हीसी सुरू करा 
मुंबई

तुरुंग, न्यायालयांमध्ये मार्चपर्यंत व्हीसी सुरू करा

सकाळवृत्तसेवा

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई : राज्यातील सर्व तुरुंग व न्यायालयांमध्ये मार्चअखेरपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्ही. सी.) सुरू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 6) दिले.
तुरुंगांमधील कैद्यांना पोलिस संरक्षणाअभावी न्यायालयात हजर केले जात नाही, असे निदर्शनास आणणाऱ्या जनहित याचिकांवर आज सुनावणी घेण्यात आली. मुंबईसह राज्यातील एकूण 2,200 न्यायालयांपैकी 248 न्यायालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा नाही. काही ठिकाणी विजेचा प्रश्‍न, नेटवर्क व अन्य तांत्रिक अडचणींमुळे अजून ही सेवा दिलेली नाही, अशी कबुली राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. सुविधा नसलेल्या न्यायालयांमध्ये चंद्रपूरसह, वर्धा व मुंबईचाही समावेश आहे. न्यायालये व कारागृहांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसह सीसीटीव्ही व अन्य अद्ययावत यंत्रणेवरही राज्य सरकारने भर द्यावा, असे निर्देश न्या. व्ही. एम. कानडे व न्या. नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने दिले. अनेक ठिकाणी निधीअभावी ही यंत्रणा सुरू केलेली नाही, असे उच्च न्यायालय प्रशासनाच्या वतीने ऍड. एस. आर. नारगोळकर यांनी खंडपीठाला सांगितले. मात्र, राज्य सरकारकडे निधी भरपूर आहे; परंतु तो योग्य ठिकाणी वापरला जात नाही, अशी नाराजी खंडपीठाने व्यक्त केली. याचिकेवर एप्रिलमध्ये सुनावणी आहे. त्या वेळी याबाबतचा सविस्तर अहवाल दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT