मुंबई

मुंबईतून कोरोनाला पळवून लावण्यासाठी 'मोठं' पाऊल; झोपडपट्टी, चाळीत राहणाऱ्यांसाठी...

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 23 : मुंबईत झोपडपट्टी त्याचबरोबर दाटीवाटीची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. तेथील लोकांना क्वारंटाईन करणे अवघड झाल्याने या परीसरतील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस पसरत असल्याचे दिसते. त्यावर तोडगा काढत मुंबईत संस्थात्मक म्हणजेच इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन वाढविण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील अधिकतर लोकसंख्या ही झोपडपट्टी तसेच चाळीमध्ये राहणारी आहे. त्याठिकाणी असलेल्या दहा बाय दहाच्या खोलीत पाच ते सहा जणांचे कुटुंब दाटीवाटीने राहते. कमी जागेमुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, त्यामुळे या वस्त्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसते. अशा वेळी दाट लोकवस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यलयांमध्ये मध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था करण्यात येणार आहे. 

मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासकरून धारावी, वरळी, नागपाडा , परळ इत्यादी परिसरातील नागरिकांना क्वारंटाईन करायचे झाल्यास त्यांची व्यवस्था नजीकच्या शाळा, महाविद्यालय किंवा मोठ्या हॉलमध्ये करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे वाढता कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यास मदत मिळू शकते. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर आणण्यात यश मिळाले आहे. ती संख्या आणखी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

संस्थात्मक क्वारंटाईन म्हणजे काय ?

दाटीवाटीने असणाऱ्या परिसरातील शाळा,महाविद्यालये यांसारख्या इमारती ताब्यात घ्यायच्या. या इमारतींमध्ये लोकांना क्वारंटाईन करायचे . त्यामुळे एका घरातील किंवा परिसरातील गर्दी कमी होण्यास मदत मिळेल. तसेच लोकांना यशस्वी क्वारंटाईन करण्यात यश मिळेल.

quarantine facilities in highly dens populated areas wil be increased by BMC

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT