108 वाहन
108 वाहन 
मुंबई

त्यांनी संप केला आणि...

सकाळ वृत्तसेवा

अलिबागः जिल्ह्यातील 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकाचालकांचे वेतन सरकारकडून थकले होते. त्यामुळे शुक्रवारी (ता. 17) दुपारनंतर चालकांनी संप पुकारला होता. या संपामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल झाले. त्यामुळे सरकारने अवघ्या 24 तासांमध्ये शनिवारी (ता. 18) रुग्णवाहिकाचालकांचे वेतन तातडीने त्यांच्या बॅंक खात्यात जमा केले. त्यानंतर रुग्णवाहिका सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.

भिवंडीतील निर्भयाला मिळाला महिनाभरात न्याय
 
जिल्ह्यात सरकारच्या 108 क्रमांकाच्या 23 रुग्णवाहिका असून, त्यावर 55 चालकांची नेमणूक केली आहे. दर महिन्याला 10 तारखेला चालकांच्या खात्यात वेतन जमा होते; परंतु गेल्या महिन्यापासून वेतन देण्यास कंपनीकडून दिरंगाई होऊ लागली. अनेक वेळा ही बाब कंपनीबरोबरच प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तरीही त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे महाराष्ट्र रुग्णवाहिका 108 वाहनचालक संघटनांतील चालक शुक्रवारी सायंकाळपासून संपावर गेले. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. सरकारच्या मनमानी कारभाराचा आर्थिक फटका रुग्णांच्या नातेवाइकांना बसला. रुग्णांचे हाल होत असल्याचे लक्षात आल्यावर तातडीने रुग्णवाहिकाचालकांच्या खात्यात शनिवारी सायंकाळी वेतन जमा करण्यात आले. त्यानंतर चालकांनी संप मागे घेतला.

गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिकेवरील चालक काम करीत आहेत. अन्य जिल्ह्यांतील चालकांना 15 ते 20 हजार रुपये वेतन आहे; परंतु येथील चालकांवर अन्याय होत आहे. तरीही रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून काम केले आहे; मात्र ते वेतनही वेळेवर दिले जात नाही. गाड्यांची वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने फार मोठी अडचण निर्माण होते. त्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. 
- स्वप्नील म्हात्रे, खजिनदार 
राज्य रुग्णवाहिका 108 वाहनचालक संघटना 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT