Raigad festival news  sakal
मुंबई

Raigad Festival: ‘हॅपिनेस इंडेक्‍स’ वाढवण्यासाठी कोट्यवधी खर्च पण प्रेक्षकांची पाठ!

अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजनी कार्यक्रमात खुर्च्या मोकळ्या

सकाळ वृत्तसेवा

वाढती महागाई, अस्थिर राजकीय स्थिती, बंद पडणारे कारखाने, सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती यांसारख्या समस्यांमुळे रायगडमधील जनता त्रस्त आहे. जनतेचे मनोबल उंचावण्यासाठी (हॅपिनेस इंडेक्‍स) राज्य सरकारच्या वतीने चार कोटी रुपये खर्चून ‘रायगड महासंस्कृती महोत्सव’ साजरा केला जात आहे.

मात्र, योग्‍य नियोजनाअभावी नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याने कार्यक्रमाचा फियास्को झाल्याचे दिसते. एकाच वेळी १० हजार प्रेक्षक बसतील, अशी आसनव्यवस्था करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात दीड हजारापेक्षा जास्त प्रेक्षक नव्हते. त्‍यामुळे उर्वरित दिवसांसाठी प्रेक्षक कसे जमवायचे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.

शिवराज्याभिषेकदिन सोहळा , महाराष्ट्र भूषण पुरस्कार असे मोठे कार्यक्रम आयोजित करण्याचा अनुभव असलेल्या रायगडचे जिल्हा प्रशासन महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजनात अपयशी ठरले आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता होणारा उद्‌घाटन समारंभ रात्री आठला सुरू झाला. त्‍यानंतर अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजनी कार्यक्रमाला प्रेक्षकच नसल्‍याने खुद्द गुप्ते यांनी नाराजी व्यक्त केली.

अलिबागच्या पोलिस परेड मैदानावर महोत्‍सवाच्या रंगारंग कार्यक्रमासाठी स्टेज उभारण्यात आला आहे. पाच दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी संधी देण्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात होते. जिल्ह्यातील कलाकारांनाही तसे आवाहन करण्यात आले, मात्र, स्थानिक कलाकारांनीही फारसा प्रतिसाद न दिल्‍याने उर्वरित कार्यक्रम कसे साजरे करायचे, याचा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.

स्थानिक कलाकारांची नाराजी

बिग बजेट कलाकारांना २५ लाख रुपयांपर्यंत मोबदला देताना स्थानिक कलाकारांना जिल्हा प्रशासनाकडून अगदी कवडीमोल मोबदला दिला जाणार होता. शिवाय योग्य प्रकारे समन्वय न साधल्याने कार्यक्रमात सहभागी होता आले नसल्‍याची नाराजीही स्थानिक कलाकारांनी व्यक्त केली आहे. बिग बजेट कलाकारांना लाखो रुपये देत असताना स्थानिक कलाकारांना वाहतुकीचा खर्च भागवण्याइतकाही मोबदला जिल्‍हा प्रशासनाने दिला नाही.

कार्यक्रमाचे चुकीचे नियोजन

सध्या परीक्षाचा माहोल सुरू झाले आहे, अभ्यासात व्यत्यय नको म्हणून अनेकजण कार्यक्रमास येण्याचे टाळतात. त्यातच माघी गणेशोत्सवामुळे बहुतांश नागरिक सायंकाळी घराबाहेर पडण्यास तयार नसतात. याची पूर्व कल्पना जिल्हा प्रशासनाला होती; मात्र, मंत्रालयातूनच आदेश आल्याने घाईगडबडीत प्रशासनाला महोत्सवाचे नियोजन करावे लागले. नियोजनासाठी अवघे दहा दिवस देत सर्व विभागांना महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी लावण्यात आले. यात अनेक उणिवा राहिल्या. महोत्‍सवाची जाहिरात करण्यातही प्रशासनाला अपयश आल्याने कार्यक्रमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

‘हॅपिनेस इंडेक्‍स’ कोणाचा वाढला?

महासंस्कृती महोत्‍सवाचे आयोजन राज्यभर सुरू आहे. महोत्‍सवाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश नागरिकांचा खालावलेला हॅपिनेस इंडेक्स उंचावण्याचा आहे. धकाधकीच्या जीवनात नागरिकांना आनंद मिळावा, थोडीशी करमणूक व्हावी व मानसिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. यासाठी राज्य सरकारने दोन कोटी रुपये देऊ केले असून तर उर्वरित निधी सीएसआर फंडातून जमा करण्यात आला आहे. कार्यक्रमास दरदिवशी १० हजार प्रेक्षक उपस्‍थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे, प्रत्यक्षात मात्र दोन हजार प्रेक्षकही येणे मुश्कील झाले आहे. कोट्यवधींचा खर्च करून कोणाचा हॅपिनेस इन्डेक्स वाढला, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

हक्काच्या सीएसआर फंडावर डल्ला

नैसर्गिक आपत्ती व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी स्‍थानिक कंपन्यांकडे जिल्हा प्रशासन दरवर्षी साकडे घालते. जिल्ह्यातील कंपन्याही अशा कारणांसाठी सढळ हस्ते मदत करतात. रायगडकरांच्या अडीअडचणीला हक्काने वापरता येणारा हा निधी जिल्हा प्रशासनाने बिग बजेट कलाकारांवर खर्च केला आहे. महासंस्कृती महोत्सवासाठी अडीच कोटीच्या आसपास सीएसआर फंड वापरला गेल्‍याची चर्चा आहे.

खालावलेला हॅपिनेस इन्डेक्स उंचावणे आणि रायगडची लोकसंस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. यातून रायगडमधील लोकनृत्य, लोककला सादर करण्याची संधी स्थानिक कलाकारांना देण्यात आली. यासाठी राज्य सरकारचे दोन कोटी रुपये तर उर्वरित खर्च सीएसआरमधून केला जात आहे.

- डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT