रायगडवासीय अद्यापही अंधारातच; वीज कंपनीचे कर्मचारी दुर्गम भागात पोहचलेच नाही! 
मुंबई

रायगडवासीय अद्यापही अंधारातच; वीज कंपनीचे कर्मचारी दुर्गम भागात पोहचलेच नाही!

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळ शांत होऊन अर्धा महिना होऊन गेला तरीही माणगाव, श्रीवर्धन, मुरुड, रोहा, तळा आणि म्हसळा, अलिबाग या सर्वात जास्त प्रभावीत तालुक्यांमधील ग्रामीण भाग अद्यापही अंधारातच आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकही तितकेच उत्स्फुर्तपणे सहकार्य करीत असले तरी वीज कंपनीचे अभियंते दुर्गम भागात पोहचलेलेच नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.


पावसाच्या व्यत्ययामुळे हे काम वाढतच चालले आहे. त्यामुळे अंधारात असलेला दुर्गम भाग प्रकाशात आणण्यासाठी किमान पंधरा दिवस लागतील, असा अंदाज महावितरण कंपनीचा आहे. वाकलेले पोल बाजूला करुन नवे पोल टाकण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. यासाठी येथील सामाजिक संस्था, ग्रामस्थ स्वयंस्पुर्तीने सहकार्य करीत आहेत. आता औरंगाबाद, अकोला येथीलही महावितरणचे अभियंते रायगडमध्ये दाखल झालेले आहेत. पोल टाकणे आणि तारा खेचण्यासाठी जेसीबी, क्रेनचा वापर केला आहे. त्याचबरोबर कमकुवत झालेली झाडे तात्काळ काढली जात आहेत. यासाठी लागणारी मनुष्यबळाची कमतरता ग्रामस्थ भरुन काढत आहेत; परंतु झालेले नुकसानच मोठ्या प्रमाणात असल्याने प्रभावित तालुक्यांमधील महत्वाच्या शहरांमधीलच वीज सुरु झाली आहे. तर ग्रामिण भागात पोल टाकण्याचेच काम संपलेले नाही. अद्यापही शहरीभाग वगळून श्रीर्वर्धन तालुका नव्वद टक्के, रोहा-मुरुड तालुके साठ टक्के, तळा-माणगाव तालुका सत्तर टक्के अंधारात आहे. दुरुस्तीच्या कामात सुरु होणाऱ्या  पावसामुळेही व्यत्यत येत आहे. मागील दहा दिवसात या भागात 27 मिमी सरासरीने पाऊस पडला. यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरुन लोखंडी पोल, अवजड यंत्रसामग्री पोहचवणे कठीण जात आहे. 

अभियंत्यांचे दिवसरात्र काम सुरु आहे. वीज पुरवठा सुरु करण्याची जबाबदारी फिडरनुसार देण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम अधिक गतीने होईल आणि कोणताही भाग दुर्लक्षीत राहणार नाही. अभियंत्यांना येथील नागरिकांचेही तितकेच चांगले सहकार्य मिळत असले तरी यावर पावसाचाही परिणाम दिसून येत आहे.
- ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण (भांडुप विभाग)

ग्रामीण भाग दुर्लक्षीत राहिलेला आहे. येथे वीज कंपनीचे कर्मचारी पोहचतच नाहीत. माणगाव तालुक्यातील भागाड बौध्दवाडी येथील लोकांनी स्वतः पैसे काढून पडलेले पोल उभे केले आहेत. गावातील समाजसेवक संजय गुळणबे यांनी स्वतःच्या गाड्या दिल्या व पोल पोहचवले. खडी, रेती, सिमेंट स्वतः आणले. सर्व सामान आणून दिल्यानंतरही हे काम पुर्ण झाले नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात अनेक गावे आहेत. या गावांकडे लक्ष द्यावे, अन्यथा रिपब्लिकन सेना स्टाईलने आंदोलन केले जाईल.
- रमेश जाधव, कामगार नेते, मुंबई प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT