railway station
railway station sakal
मुंबई

सायन स्थानकात पाणी साचू नये यासाठी रेल्वचा नवीन प्लान

कुलदीप घायवाट

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सायन रेल्वे स्थानकाच्या (Sion railway station) रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प होते. दरवर्षी नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासाच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ( Central railway)रेल्वे रुळांची उंची वाढविण्यात येणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सायन रेल्वे स्थानकाच्या (Sion railway station) रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प होते. दरवर्षी नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासाच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ( Central railway)रेल्वे रुळांची उंची वाढविण्यात येणार आहे. मात्र, त्यामुळे कमी उंचीवर असलेल्या रेल्वे उन्नत मार्ग तोडण्यात येणार असून नवीन उंच उन्नत मार्ग उभारला जाणार आहे.(Railway government has a new plan for water logging problems of sion station)

पावसाची रिपरिप सुरू झाली की, मध्य रेल्वे मार्गाच्या कुर्ला-सायन-माटुंगा दरम्यान पाणी भरते. पाण्याचा उपसा केला तरी, पाण्याची पातळी कमी होत नाही. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प करावी लागते. यावर उपाय म्हणून सायन येथील रेल्वे रुळांची उंची(Railway Track Hight)वाढविली जाणार आहे. मात्र, रुळांची उंची वाढविल्याने ओव्हरहेड वायरची उंची वाढवावी लागेल. त्यामुळे येथील कमी उंचीचा रेल्वे उन्नत मार्ग तोडून नवीन उंच उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे.

सध्याचा सायन येथे असलेला रेल्वे उन्नत मार्ग रेल्वे रूळांपासून 5.1 मीटर उंचीवर आहे. तर, रेल्वे रूळांची उंची सहा इंच इतकी वाढविण्यात येणार आहे. यासाठी हा पूल 5.4 मीटर उंचीवर उभारण्यात येणार आहे. या नव्या पुलाचे काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. त्यासाठी एप्रिल महिन्यात निविदा काढली जाणार आहे. सायन रेल्वे स्थानकावरील उन्नत मार्ग एलबीएस रोड, पूर्व द्रुतगती मार्ग, धारावी लिंक रोडशी जोडतो. त्यामुळे सध्या सुरू असलेली वाहतूक कोणत्या मार्गाने वळवायची याकरिता पालिका आणि वाहतूक पोलिस विभागाद्वारे चर्चा सुरू आहे. या पुलाच्या उभारणासाठी सुमारे 30 महिन्यांच्या कालावधी लागणार असून यासाठी 25 कोटी खर्च अपेक्षित आहे,अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत; व्हिडिओ समोर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT