Mumbai: Railway  sakal
मुंबई

Mumbai: इगतपुरी यार्डमध्ये रेल्वेची मॉकड्रील; कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका!

सकाळ वृत्तसेवा

Railway News: रेल्वे दुर्घटना, आगीच्या घटना, पूल कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर सुरक्षा विभागाने कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे.

याबाबत मध्य रेल्वेने कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देत असते. सोमवारी मध्य रेल्वेने,इगतपुरी अप यार्डमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत संयुक्तरित्या यशस्वी मॉकड्रिल केली.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज इगतपुरी अप यार्ड येथे एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत संयुक्तरित्या यशस्वी मॉकड्रिल घेण्यात आली आहे. सर्वप्रथमक सकाळी ११.१० वाजता मॉकड्रिलची सुरुवात झाली.

इगतपुरी अप यार्डमध्ये एक डब्या रेल्वे रुळावरून घसरून अचानक आग लागली. या अपघातांची माहिती मुंबई विभागाच्या नियंत्रण कक्षाला निरोप देण्यात आला. नियंत्रण कक्षाने तातडीने कार्यवाही करत एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वे अपघात मदत वाहन (एआरटी) आणि सर्व संबंधितांना संदेश पाठविला. सकाळी सव्वा अकरा वाजता रेल्वेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.

तसेच एनडीआरएफची एक तुकडी सकाळी ११.१९ वाजता घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तत्काळ संरक्षण दलाच्या व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.

रेल्वेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांकडून अग्निशामक यंत्रांचा वापर करून त्यांनी ११.२४ वाजता आग नियंत्रणात आणली.एनडीआरएफच्या पथकाने सकाळी ११.२५ ते १२.०६ या वेळेत एकूण १८ जखमींना वाचवले. त्याचवेळी एनडीआरएफ आणि एआरटी च्या पथकांनी सदर डब्याचे छत दोन्ही बाजूंनी कापून प्रत्येकी एक जीव वाचवला.

रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी, एनडीआरएफला प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.या पथकात 'फेरो' नावाचा आठ वर्षांचा कुत्रा देखील आपली भूमिका बजावत होता.संकटकाळातील तयारी आणि प्रभावी प्रतिसाद यंत्रणेच्या माध्यमातून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेची वचनबद्धता या सरावातून दिसून आली.

अपघाताची पूर्वतयारी आणि त्याच्या जलद प्रतिसादासाठी रेल्वेकडून संयुक्तपणे असे सराव सुरू राहतील. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या सुरक्षा विभागाने या सरावाचे संयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT