csmt railway staion sakal
मुंबई

Railway News: आता रेल्वे स्थानकात महिलांना मिळणार मोफत प्रसाधनगृहांची सुविधा!

महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक आहेत. Women passengers will get a big relief. Chhatrapati Shivaji Maharaj Terminus is the busiest railway station.

सकाळ वृत्तसेवा, Chinmay Jagtap

Railway News: रेल्वे स्थानकावर मोफत प्रसाधनगृह सुरू केली असली तरी, महिला प्रवाशांना प्रसाधनगृहाच्या सुविधेसाठी पैसे मोजावे लागत होते.

मात्र आता मध्य रेल्वेने ‘डी-मार्ट फाऊंडेशन’सोबत धोरणात्मक भागीदारी करून सीएसएमटी स्थानकात प्रसाधनगृहांची सुविधा महिला प्रवाशांना मोफत उपलब्ध करून देणार आहे.

त्यामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक आहेत. उपनगरी लोकल सेवा आणि मेल एक्सप्रेस गाड्यांची प्रवासी संख्या लक्षात घेता दररोज सीएसएमटी रेल्वे स्थानकांत दहा ते बारा लाख प्रवासी या स्थानकावर ये- जा करतात.

सीएसएमटीच्या तर उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी फक्त एकच प्रसाधनगृह असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. रोजच्या लाखो प्रवाशांचा भार या एका स्वछतागृहावर पडत होता.

हे लक्षात घेता मध्य रेल्वेने उपनगरीय विभागात आणखी एक अत्याधुनिक, दुर्गंधीमुक्त, वातानुकूलित पुरुष शौचालयाची उभारणी केली. त्याचा फायदा पुरुष प्रवाशांना होत आहे.

मात्र महिला प्रवाशांच्या प्रसाधनगृहे असले तरी त्याच्याकडून कंत्राटदार स्वच्छतेचे कारण पुढे करून ५ रुपये शुल्क आकरत होते.सीएसएमटी रेल्वे स्थानकातील तीन ठिकाणच्या शौचालयांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या लाखांच्या घरात आहे.

शौचालय वापरासाठी प्रवाशांची आर्थिक लूट होते. शिवाय सुविधा नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वारंवार केल्या जात होत्या. त्याची गंभीर दखल मध्य रेल्वेने घेतली आहे.

आता जबाबदारी ‘डी-मार्ट फाऊंडेशनवर

प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी महिलांना मोफत शौचालय सेवा सुरू करण्यात आली आहे. महिलांना एकदा शौचालय वापरासाठी ५ रुपये मोजावे लागत होते. मात्र, डी मार्ट फाऊंडेशनमुळे ही सुविधा मोफत मिळणार आहे. सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ५-६, १५-१६ आणि १८ वरील शौचालयाची देखभाल, साफसफाईची जबाबदारी ‘डी-मार्ट फाऊंडेशन’ने स्वीकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHT 2025-26: पडिक्कलने कोणालाच न जमलेला विक्रम केला, निवड समितीच्या नाकावर टिच्चून केली दमदार खेळी; मुंबईला फेकले स्पर्धेबाहेर

BJP Mumbai : मुंबईचा भूमीपुत्र, ‘मराठी माणूस’ मुंबईतच राहणार!',भाजपचा यशस्वी 'मास्टरप्लॅन'

Crime News : मुलाच्या निधनानंतर पैशाची हाव; सासऱ्याचं सुनेसोबत भलतंच कृत्य, महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?

Pune Crime : "पोलिसांत गेला तर जीपला बांधून वरात काढीन"; सावकाराची धमकी, लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल.

Election News: महानगरपालिका निवडणुकीआधी मतदान केंद्रांत बदल; केंद्रे स्थलांतरित, कुठे आणि का? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT