mumbai local
mumbai local file photo
मुंबई

रेल्वेने कलव्हर्टसाठी केलेला 30 कोटींचा खर्च पाण्यात ?

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वे (central railway) मार्गावरील कुर्ला ते सायन दरम्यान पावसाचे पाणी रेल्वे रूळाच्या धोकादायक पातळीवर गेल्याने लोकल सेवा ठप्प झाली. त्यामुळे रेल्वेच्या मान्सून पूर्व तयारी, कलव्हर्ट स्वच्छतेबाबत प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मागील 12 वर्षात 30 कोटींहून अधिक रक्कम रेल्वेच्या 116 कलव्हर्ट वर खर्च केला आहे. मात्र, कलव्हर्ट स्वच्छ न केल्याने रेल्वे सेवेला फटका बसला आहे. त्यामुळे 30 कोटी पाण्यात बुडाल्याची टिका करण्यात येत आहे. (Railways 30 crore on culvert is waste of money)

उपनगरीय रेल्वे मार्गावरील कलव्हर्ट प्रत्येक वर्षी रेल्वे प्रशासन स्वच्छ करते. पालिका प्रत्येक वर्षी 3 ते 4 कोटी शुल्क अदा करते. मागील 12 वर्षात रेल्वेला 30 कोटी प्राप्त झाले. मात्र, याबाबत आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा ऑडिट रेल्वेने केलेलं नाही. तर, पालिकेने देखील खर्चाचा हिशोब मागितला नाही. उपनगरीय रेल्वे मार्गातंर्गत 116 कलव्हर्ट असून 53 मध्य रेल्वे, 41 पश्चिम रेल्वे आणि 22 हार्बर रेल्वेत आहेत.

वर्ष 2009-2010 ते वर्ष 2017-18 या 9 वर्षात 23 कोटी रुपये मुंबई पालिकेने रेल्वे प्रशासनाला दिले होते. वर्ष 2018-19 मध्ये 5.67 कोटी रुपये दिले होते. एकंदरीत मागील 12 वर्षात 30 कोटीहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. यावर्षी पालिकेने सीएसएमटी ते मुलुंडपर्यंतच्या रेल्वेच्या सर्व नाल्यांची सफाई अवघ्या 15 दिवसात पूर्ण करण्याचा दावा केला आहे, असे माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.

दरवर्षी पावसाळयापूर्वी पालिकेकडून रेल्वेला पैसे देण्यात येतात. मात्र, नालेसफाईचे कोणतेही ऑडिट होत नाही. मागील 3 वर्षांपासून रेल्वे सेवा कुर्ला आणि सायन दरम्यान ठप्प होते. 31 मे पर्यंत कलव्हर्ट साफ करून सर्व्हेक्षण केल्यास आतासारखी परिस्थिती उद्भवणार नाही. कुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान पाणी साचणे, लोकल सेवा ठप्प होणे, या घटनेला महापालिका रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. तसेच, रेल्वे आणि पालिका यांनी मान्सून काळात केलेली कामे, आलेला खर्च, काढलेला गाळ यांची इत्यंभूत माहिती सर्वसामान्यांच्या माहितीसाठी ऑनलाइन उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे गलगली यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT