Shahapur Rain esakal
मुंबई

Shahapur Rain : शहापुरात रहिवाशांचा रास्ता रोको; पुरास कारणीभूत ठरणारे अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी

इमारतीच्या खाली पार्किंग केलेली वाहने वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.

नरेश जाधव

भारंगी नदीपात्रात बांधकाम करण्यासाठी परवानगी देणाऱ्या प्रशासन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

खर्डी : काल (शनिवार) रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूरमधील भारंगी नदीच्या पात्रातील (Bharangi River) पाणी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात घुसून अनेक कुटुंबांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. शिवाय, इमारतीच्या खाली पार्किंग केलेली वाहने वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.

भारंगी नदीच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली येथे होणारे अतिक्रमण (Encroachment) या पुरास कारणीभूत असल्याने येथील अतिक्रमणे तात्काळ काढून टाकण्यात यावीत व नुकसानग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी स्थानिक रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे शहापूर-आसनगाव रस्त्यावर रास्ता रोको केला. मुसळधार पावसामुळे कल्याण-कसारा मध्य रेल्वे मार्गावर वासिंद, आसनगाव व आटगाव येथे रेल्वे लाईनवर झाडे पडल्याने, मातीचा मलभा व पोल बाजूला सरकल्याने टिटवाळा-कसारा वाहतूक तीन तासापासून बंद आहे.

भारंगी नदीपात्रात शहापूर नगरपंचायतमार्फत भविष्यात येणाऱ्या अडचणींबाबत नियोजन न करता केलेल्या सुशोभीकरण कामामुळे काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इमारतीच्या घरात पाणी शिरले. पार्किंगमधील 7/8 चारचाकी, 25/26 मोटारसायकल वाहून गेल्याची घटना घडली आहे. नगरपंचायतच्या दुर्लक्षामुळे येथील कामे न झाल्याने अनेक स्थानिक रहिवाशांचे नुकसान झाले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

शहापूर-आसनगाव रस्त्यावर नगरपंचायत प्रशासनाविरोधात अविनाश किरपण, स्वप्नील भोईर, संतोष शिंदे यांच्यासहित स्थानिक रहिवाशांनी सकाळी 6.30 पासून रास्ता रोको केल्याने येथील वाहतूक ठप्प झाली असून पोलिसांनी ही वाहतूक मुंबई-आग्रा महामार्गवरून नंतर सुरू केली. यावेळी आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, तहसीलदार कोमल ठाकूर, शहापूरचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी भेट दिली.

भारंगी नदीपात्रात बांधकाम करण्यासाठी परवानगी देणाऱ्या प्रशासन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. भारंगी नदीपात्रात पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या कुटुंबांच्या मालमतेचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार कोमल ठाकूर यांनी दिले असून तात्काळ पंचनामे करण्याचे काम तलाठ्यामार्फत सुरू करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT