aditya thackeray
aditya thackeray Sakal
मुंबई

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधीच मनसेचं ट्वीट; "सेटिंग करुन..."

वैष्णवी कारंजकर

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर स्थानिक नेत्यांचा विरोध आणि राज ठाकरेंची तब्येत अशा काही कारणांमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, आता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन मनसे नेत्यांनी त्यांना टोला लगावला आहे. (Aditya Thackeray Ayodhya Visit)

मनसे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन ट्वीट करत टोला लगावला आहे. संदीप देशपांडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात,"आज एक जुनी गोष्ट आठवली जेंव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत असलेले सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते. काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा त्या वेळी आस्वाद घेत असतील. फक्त राजसाहेबच तिथे प्रचार करत होते. सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यातला फरक आहे."

अयोध्येच्या दौऱ्यासाठी राजकीय नेतेमंडळींमध्ये चढाओढ लागलेली असतानाच महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment minister and Shivsena leader Aditya Thackeray) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (MNS leader Raj Thackeray) आधी बाजी मारली आहे. तर दुसरीकडे मनसे मात्र स्थानिक विरोधामुळे अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने काहीशी बॅकफुटला आली असल्याचे दिसून आले आहे. आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा १५ जून म्हणजे आज आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंचा दिवसभराचा असा भरगच्च कार्यक्रम आहे. त्यामध्ये रामललाच्या दर्शनापासून ते सायंकाळी अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर आदित्य ठाकरेंकडून आरती करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT