मुंबई

वाईन शॉप्स सुरु करा; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्य सरकारने महाराष्ट्रातील वाईन शॉप्स सुरु करावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर एक तोडगा म्हणून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे वाईन शॉप्स सुरु करण्याची मागणी केलेली आहे.

राज्याचा महसूल सुरु ठेवण्यासाठी काही व्यवसाय सुरु ठेवण्याची मागणी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीये. महाराष्ट्रातील वाईन शॉप्स सुरु ठेऊन राज्याच्या महसुलाची तजबीज करता येऊ शकते म्हणून कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीये. दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझा उद्देश नाही असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या आवर्जून म्हटलंय.

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात महाराष्ट्रातील लहान हॉटेल्स, पोळी भाजी केंद्र, लहान खानावळी किंवा राईस प्लेट देणाऱ्या खानावळी सुरु कराव्यात अशाही काही बाबी सुचवल्यात. राज्याची सध्याची परिस्थिती पहिली तर राज्यात PPE किट्स ची कमतरता आहे, अनेकांना वेळेवर जेवण मिळत नाहीये, अनेकांचे सध्याच्या परिस्थिती हाल होतायत.  

अशात राज्याच्या तिजोरीत हवे तेवढे पैसे नाहीत. राज्याच्या तिजोरीत पैसे जमणे गरजेचं आहे. वाईन शॉप्सच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत महसूल यायला सुरवात होऊ शकते. म्हणून वाईन शॉप सुरु करा अशी महत्त्वाची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.   

raj thackeray suggest cm uddhav thackeray to reopen wine shops

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदी उद्या पंजाबमधील पूरग्रस्त भागाचा करणार दौरा, आर्थिक मदतीची घोषणा करण्याची शक्यता

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'Avocado Paneer Toast', सोपी आहे रेसिपी

Ganpati Visarjan 2025:'सातारा जिल्ह्यात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप'; विसर्जन मिरवणुका उत्साहात, पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती

Kaas Pathar:'कास पठाराला तीन दिवसांत हजारो पर्यटकांची भेट'; निसर्ग सौंदर्याचा लुटला मनमुराद आनंद, फुले बहरण्यास सुरुवात

Ganpati Visarjan 2025 : गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरात १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT