Raj Thackeray delivers a bold message during Mira Road rally, warning BJP MP Nishikant Dubey over political interference.   esakal
मुंबई

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Raj Thackeray Mira Road Speech: ''पुन्हा एकदा सांगतोय..तुमची सत्ता असेल ती लोकसभा आणि विधानभवनात, आमची सत्ता रस्त्यावरती आहे.'' असा इशाराही दिला आहे.

Mayur Ratnaparkhe

Raj Thackeray Targets BJP MP in Mira Road Rally: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज(शुक्रवार) मीरा रोड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी मराठीच्या मुद्य्यावर आक्रमक भूमिका मांडली. तसेच, हिंदी सक्तीवरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या पटक-पटक के मारेंगे या इशाऱ्यालाही जोरदार प्रत्युत्तरही दिलं.

राज ठाकरे म्हणाले, ''त्यादिवशी तो एक भाजपचा दुबे नावाचा खासदार काय बोलला? मराठी लोगो को हम यहापें पटक-पटक कर मारेंगे.. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनलवाल्यांनी काही दाखवलं का? पुढे चालवलं का? बघा कसे असतात.''

तसंच ''तू आम्हाला पटक-पटक के मारणार? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई मै आजाओ.. मुंबई के समुंदर मै डुबे डुबे कर मारेंगे.. यांना हिंमत होते बघा कशी.. तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते.. तुम्ही जर अमराठी माणसाबद्दल बोललात तर ती राष्ट्रीय बातमी..आणि हे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना माहिती असतं, सरकार त्यांच्या मागे आहे. कारण, सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल, तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे.'' असं राज ठाकरे म्हणाले.

याशिवाय ''एक गोष्ट मी त्या दिवशी सांगितली आणि पुन्हा एकदा सांगतोय..तुमची सत्ता असेल ती लोकसभा आणि विधानभवनात, आमची सत्ता रस्त्यावरती आहे. काहीनाही ५६ इंचाची तुम्हीपण छाती बाहेर काढून फिरा..हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे..परत कोणी जर महाराष्ट्रात वेडवाकडं वागण्याचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही.'' असा कडक इशारा यावेळी राज ठाकरेंनी दिला.

तत्पुर्वी भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे म्हणाले की, ''कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली मराठीत सांगावं लागेल. मीरा भाईंदरमध्ये घडलेला प्रसंग छोटा होता. हिंदी सक्तीचा मोर्चा सुरु होता, त्यात व्यापाऱ्याने विरोध केला. त्यावर इथल्या व्यापाऱ्यांनी बंद करायची गरज नव्हती. तुम्हाला काय वाटतं, मराठी व्यापारी नाहीत. आम्ही काही घेतलं नाही तर तुमचं दुकान चालेल का? महाराष्ट्रामध्ये राहताय तर मराठी शिका, शांतपणे राहा. पण इथे मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis on cabinet subcommittee : मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा! मंत्रिमंडळ उपसमितीचं फडणवीसांकडून विशेष कौतुक, म्हणाले...

KCR News : केसीआर यांनी स्वत:च्या मुलीची पक्षातून केली हाकालपट्टी; BRS मधील अंतर्गत वादाला नवे वळण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या यशस्वी आंदोलनानंतर शिरूरमध्ये जल्लोष, गुलाल उधळून साजरा

Ajit Pawar : करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखलंच नाही; दादांचा संताप, VIDEO VIRAL

Pune News : पुण्यात पुराचा धोका वाढला; नदीची वहन क्षमता घटल्याने ४०% वाढ

SCROLL FOR NEXT