ramdas kadam ekanath shinde gajanan kirtikar  sakal
मुंबई

Lokshabha Election: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा फुटले अंतर्गत कलहाचे फटाके

कीर्तिकर-कदम यांच्यातील वाद विकोपाला

सकाळ डिजिटल टीम

Lokshabha Election: उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना (शिंदे) खासदार गजानन कीर्तिकर आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने शिंदे गटातील वाद विकोपाला गेला आहे.

कीर्तिकर यांनी पक्षनेतृत्वाला पत्रव्यवहार करत कदम यांच्यावर आरोप केले आहेत. त्या आरोपांना कदम यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिंदेंच्या सेनेतील वाद पक्षाला डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.


कदम आणि कीर्तिकर यांच्यामध्ये उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातील उमेदवारीवरून वादाला तोंड फुटले आहे. काल कीर्तिकर यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात रामदास कदम यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केला होता. त्यास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कीर्तिकर यांच्या मतदारसंघावर कदम यांनी मुलासाठी दावा केला.

त्यानंतर कीर्तिकर यांनी पक्षनेतृत्वाला थेट पत्र लिहीत टीका केली आहे. कीर्तिकर यांनी पत्रात म्हटले आहे, की त्यांच्या गद्दारीचा विषय मोठा आहे. १९९० मध्ये कदम यांनी आपला पराभव करण्यासाठी प्रयत्न केला; परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

कदम यांनी आपला इतिहास विसरू नये, अशा शब्दांत त्यांनी कदम यांना लक्ष्य केले आहे. पक्षांतरासाठीही कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारमधून खेड ते भोर असा प्रवास केल्याचा आरोप पत्रातून केला आहे.

कीर्तिकर यांच्या पत्राला उत्तर देताना कदम म्हणाले, कीर्तिकर ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे बसून चर्चा करायला हवी होती; परंतु वयोमानामुळे ते भ्रमिष्ट झाले असून त्यांना डॉक्टरांच्या उपचाराची आवश्यकता आहे. त्यांनी थेट निवेदन जारी करत बेछूट आरोप केले आहेत.

त्यांनी म्हटले की, १९९० मध्ये मी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी कांदिवलीमध्ये एक शाखाप्रमुख होतो. त्याच वेळी मला शिवसेनाप्रमुखांनी खेड मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. त्यावेळी केशव भोसले यांच्यासोबत माझी लढत होती. त्यांना दाऊदचा पाठिंबा होता.

त्यावेळी दाऊद देशातून बाहेर पळून गेला नव्हता. त्यामुळे माझी लढत दाऊद सोबत होती. माझा संघर्ष तिकडे असताना गजाभाऊंना मालाडमध्ये कशासाठी पाडायला येऊ, असा उलट प्रश्नही कदम यांनी केला. गजानन कीर्तिकरांना आता थेट ३३ वर्षांनंतर याची आठवण का आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कदम यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरेंसोबत कीर्तिकरांचा मुलगा आहे आणि ते स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. स्वतः उमेदवारी घेऊन घरी बसून मुलाला बिनविरोध निवडून आणण्याची खेळी करू नका आणि पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा इशाराही त्यांनी कीर्तिकर यांना दिला आहे. गोरेगावमधील कार्यालयात वडील आणि मुलगा एकाच कार्यालयात बसत आहेत. आपला खासदारकीचा निधी मुलाला विकासकामे करण्यासाठी देत आहेत, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur BJP : भाजप तालुका पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, अपहार केल्याचा आरोप सहन झाला नाही अन्

Post-COVID Cancer Surge: कोरोनानंतर कर्करोगाचे सावट! सोलापुरात रुग्णसंख्या दुपटीने, म.फुले योजनेत केमोथेरपीचे प्रमाण वाढले

CM Relief Fund:'सोलापुरातील कारखान्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 15 कोटी मिळणार': मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

IPL vs ICC : प्रत्येकी ५८ कोटी! दोन खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझीकडून ऑफर; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची अट...

Latest Marathi News Live Update : आमदार राहुल कुल यांचा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत सुपूर्द

SCROLL FOR NEXT