फणसाड : अभयारण्य परिसरातील रानगवे.
फणसाड : अभयारण्य परिसरातील रानगवे. 
मुंबई

रानगव्यांचा पुन्हा गवगवा!

सकाळ वृत्तसेवा

रोहा (बातमीदार) : विपुल वनसंपदेमुळे देशभर प्रसिद्ध असलेल्या फणसाड अभयारण्यात गव्यांचा वावर आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ‘आऊल’ संस्थेने दोन वर्षांपासून केलेल्या शास्त्रीय अभ्यासामुळे ९ रानगवे असल्याचे सिद्ध झाले असून या कळपात ५ वृद्ध, २ तरुण आणि २ लहान गवे आहेत. 

अभयारण्यातील सुपे गावातील ग्रामस्थांनी ऑगस्ट २०१८ मध्ये परिसरात रानगवे असल्याचा दावा केला होता. याबाबत निश्‍चित माहिती मिळत नव्हती. त्याची दखल घेत ‘आऊल’ने सप्टेंबर २०१८ मध्ये वन विभागाच्या परवानगीने पाहणी सुरू केली. यामध्ये रानगव्यांच्या पावलांच्या खुणा, त्यांचे मलमूत्र दिसले. या प्राण्याच्या कळपाने भातपिकांची केलेली नासाडीही दिसली. परंतु रानगव्यांचे दर्शन झाले नव्हते. १५ सप्टेंबर २०१९ मध्ये पुन्हा पाहणी करण्यात आली. त्यामध्ये रानगव्यांचा कळप दिसला. त्यावेळी ९ गव्यांचा कळप असल्याचे सिद्ध झाले. त्यात ५ वृद्ध, २ तरुण आणि २ लहान गवे होते.

भारतीय रानगव्यांची संख्या पश्‍चिम घाटात सर्वत्र दिसत होती. केरळपासून गुजरातमधील डांगपर्यंत यांचे अस्तित्व आढळून येई. सध्या यांची नोंद महाराष्ट्रातील महाबळेश्वरपर्यंत सीमित आहे. नवीन निरिक्षणानुसार फणसाडमधील रानगव्यांचे अस्तित्व नोंदले जाणार आहे.

असे आहे फणसाड
फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरूड तालुक्‍यात विस्तारलेले आहे. त्याचा विस्तार ५२.६ वर्ग किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील अतिसंवेदनशील व राखीव अभयारण्य पैकी एक आहे.  मुख्यतः दमट हवामान आणि पर्णपाती वृक्ष येथे आढळतात. 

असा आहे रानगवा 
रानगवा हा  उंच आणि मोठा भूचर प्राणी आहे. नराचे वजन अंदाजे १ हजार ते १ हजार ५०० किलो व मादीचे वजन अंदाजे ७०० ते १ हजार किलो असते. त्यांची उंची अंदाजे १६५ ते २२० सें.मी.पर्यंत असते. जमिनीवरील हत्ती, जिराफ, पणघोडा, गेंडा याखालोखाल रानगवा हा मोठा प्राणी आहे.  
१९७२ च्या कायद्यानुसार रानगवा हा अतिसंरक्षित प्राण्यांपैकी आहे. 

दोन वर्षांच्या शास्त्रीय पद्धतीने केलेल्या निरीक्षणानंतर त्यांचा अहवाल आता सार्वजनिक करण्यात आला असून रानगव्यांचे फणसाडमधील अस्तित्व सिद्ध झाले आहे. आता त्यांच्या मार्गाचा व इथपर्यंत येण्याच्या कारणांचा शोध घेणे; तसेच त्यांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी नव्या अभ्यासाची गरज आहे.
- कुणाल साळुंखे, सचिव, आऊल्स संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT