rashmi thackeray saamna editor amruta fadnavis congratulates sanjay raut unhappy 
मुंबई

रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक; अमृता फडणवीसांकडून अभिनंदन, तर राऊत नाराज?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सामना या शिवसेनेच्या मुख्यपत्राच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळं सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा आहे. या संदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. या नाराजी संदर्भात संजय राऊत यांना विचारले असता, त्यांनी माझं काम भक्त प्रल्हादासारखं असल्याची प्रतिक्रिया दिलीय.

राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होण्यात सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यात त्यांनी महत्त्वाचं काम केलं होतं. सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत यांचे बंधू, सुनील राऊत यांचा मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा संजय राऊत यांना होती. पण, सुनील राऊत यांना कोणतेही मंत्रिपद मिळाले नाही. त्यावेळी संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्या चर्चेला तितक्याच वेगाने पूर्ण विराम मिळाला. आता राऊत हे सामनाच्या संपादक पदावरून नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरही खुद्द राऊत यांनी खुलासा करून, आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय. एबीपी माझानं या संदर्भात राऊत यांच्याशी संवाद साधला आहे.

रश्मी ठाकरे यांच्याकडे सामनाचं संपादक पद द्यायचा हा कौटुंबिक निर्णय आहे. आमच्या विश्वस्तांनी एकत्रित चर्चा करून घेतलेला निर्णय आहे. बाळासाहेबांनी मला कार्यकारी संपादक होण्याची संधी दिली. माझं काम भक्त प्रल्हादासारखं आहे.
- संजय राऊत, कार्यकारी संपादक, सामना 

अमृता फडणवीसांकडून शुभेच्छा
ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या, अमृता फडणवीस यांनी आज, मात्र ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचे अभिनंदन करून, जणू धक्काच दिला. रश्मी ठाकरे यांची संपादकपदी नियुक्ती झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, सामनाच्या संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल रश्मी ठाकरे यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्या देशात महिलांचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ते योग्य पद्धतीने मांडण्यासाठी मोठ्या पदांवर महिलांचीच नियुक्ती होण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : गणपतीला कोकणात गेलेले परतीच्या मार्गावर, रेल्वे स्टेशनवर तुडुंब गर्दी

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल,आधुनिक स्वयंचलित तराफ्याद्वारे होणार विसर्जन

SCROLL FOR NEXT