त्यांनी दिवसाढवळ्या केलं 'हे' काम; हे पाहून 'ते' संतापले 
मुंबई

त्यांनी दिवसाढवळ्या केलं 'हे' काम; मग काय 'ते' संतापले

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : भेंडखळनंतर नवघर येथील पाणथळ जागेतही दिवसाढवळ्या भराव सुरू आहे. हा भराव रेल्वेस्थानकाकरिता केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध दर्शवला आहे. पाणथळ ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप कायद्याने गुन्हा असल्याचे माहीत असतानाही संबंधित प्रशासनामार्फत केला जाणारा अट्टहास चुकीचा असून, उरणला व पर्यायाने नवी मुंबईसाठीही धोकादायक ठरणार असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले. 

याविषयी नेचर कनेक्‍टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले की, भेंडखळनंतर आता नवघरमध्येही भराव करण्यास सुरुवात झाली आहे. एकामागोमाग एक डम्पर येत असून, पाणथळवर राडारोडा टाकला जात आहे. नवघर रेल्वेस्थानकाकरिता भराव टाकला जात असल्याचे सांगण्यात येते. जवळपास एकतृतीयांश पाणथळ  जागेत भराव झाला आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणासंदर्भातील नियम धाब्यावर बसवत सिडको प्रशासनाने पाणथळ जागेत भराव करण्याचे सत्र सुरू ठेवल्याचे मत श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख  नंदकुमार पवार यांनी व्यक्त केले. पाणथळ जागेला पाणथळ न मानता पर्यावरणाच्या नियमांना तिलांजली देत सुरू असलेल्या या प्रकारची गंभीर दखल घेऊन समितीने त्वरित योग्य ती कार्यवाही करणे आवश्‍यक असल्याचेही पवार म्हणाले.  

ही बातमी वाचली का? 2020 मध्ये 'या' सिनेमांचे येणार सिक्वल

भरावाबाबत प्रशासन ढिम्म
उरणमधील बहुतांश पाणथळ जागा; तसेच खारफुटी भराव टाकून नष्ट केल्या जात आहेत. याबाबत वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारींची दखल घेत कांदळवन व पाणथळ संरक्षण संवर्धन समितीमार्फत भेंडखळ येथील भराव ताबडतोब काढून टाकण्याचे आदेश सिडको व संबंधित प्रशासनाला दिले आहेत. मात्र, समितीने दिलेली मुदत टळल्यानंतरही याबाबत सिडको व रायगड जिल्हा प्रशासनही ढिम्म असल्याचे चित्र आहे. एकापाठोपाठ एक नष्ट होणाऱ्या पाणथळांमुळे भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा पर्यावरण अभ्यासकांनी दिला.

पागोटे नवघर परिसराला गुरुवारी भेट दिली. भराव होत असलेले ठिकाण पाणथळ नाही. तेथे पावसाचे पाणी साठलेले आहे. पाणी साठलेली प्रत्येक जागा पाणथळ कशी होऊ शकते? आपल्याला विकासही हवा आहे आणि दुसरीकडे पर्यावरणाच्या नावाखाली विकासकामांना हरकत घ्यायची; हे चुकीचे आहे.
- प्रमोद पाटील, क्षेत्रीय अधिकारी, वन आणि पर्यावरण विभाग, सिडको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT