मुंबई

धारावीतील थैमान थांबता थांबेना! गेल्या 24 तासात 42 नवीन रुग्णांची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : धारावीतील रुग्णांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढल्याने धारावीकरांची धडधड वाढली आहे. आज एका दिवसात 42 रुग्ण वाढले. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांची संख्या 330 झाली आहे.

आज सापडलेल्या 42 रुग्णांपैकी 32 पुरुष; तर 10 महिला आहेत. तर, सायन रुग्णालयात 60 वर्षीय पुरुष आणि महिला तसेच कासारवाडीतील 48 वर्षीय आणि सोशल नगर मधील 55 वर्षीय पुरुष रुग्णांचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे धारावीतील मृतांचा आकडा 18 वर पोहोचला आहे. 

गेल्या 3 दिवसांमध्ये एकही रुग्ण न सापडलेल्या दादरमध्ये 4; तर माहीम मध्ये 5 नवे रुग्ण सापडले. दादर मध्ये सापडलेल्या रुग्णांमध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. स्वराज्य सोसायटी, पालिका वसाहतीत आणि पोलीस वसाहतीत हे रुग्ण आढळले.  दादर मधील एकूण रुग्ण संख्या 33 झाली आहे; तर माहीममध्ये सापडलेल्या रुग्णांमध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. माहीम पोलीस कॉलनी, गुरुदत्त सोसायटी, इंदिरा नगर, बाळ गोविंद नगर आणि कोळीवाड्यात हे पाच रुग्ण सापडले. माहिममधील एकूण रुग्णांची संख्या 30 झाली आहे. 

शिक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा
धारावी  : धारावीत दिवसेंदिवस फैलावत जाणाऱ्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी मंगळवारी आमदार व राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पालिकेच्या ग / उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी धारावीतील कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी काही नवीन खासगी रुग्णालयांमध्ये सोय करावी, धारावीत अॅम्बुलन्स सेवा वाढवावी, संशयितांचे तातडीने विलगीकरण करुन योग्य खबरदारी घ्यावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. धारावीतील नागरिकांच्या आत्मविश्वासाच्या बळावर कोरोना संसर्गा विरूद्धची ही लढाई चालू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व ते उपाय केले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''माझ्याविरोधात 45 एफआयआर आहेत, 100 पाहिजेत...'' राहुल गांधींनी सुरु केला रस्त्यावरचा एल्गार

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरकडे निघालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवले; राहुल गांधी, प्रियंका गांधी ताब्यात

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

DCM Sunetra Pawar : दुष्काळाची जाणीव ठेवा; ऊस जगविण्याचे आव्हान मोठे

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

SCROLL FOR NEXT