मुंबई

BEST नंतर अग्निशमन दलात खाजगीकरण? कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती

समीर सुर्वे

मुंबई : बेस्टच्या खासगीकरणावरुन वाद सुरु असताना मुंबई महानगर पालिका आता अग्निशमन दलातील लहान वाहाने आणि रुग्णवाहीका चालविण्यासाठी कंत्राटी चालक भरणार आहे. 54 कंत्राटी चालक भरण्यासाठी 3 कोटी 99 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात येणार आहे.

अग्निशमन दलाच्या जिप, रुग्णवाहीका चालविण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे. अग्निशमन दलात चालकांची 665 पदं मंजूर आहेत. यातील 158 पदं रिक्त आहेत. हे कायमस्वरुपी चालक प्रशिक्षीत असून त्यांना पाच वर्षांचा अग्निशमन जवाना पदाचाही अनुभव असतो. अशा चालकांकडून हलकी वाहाने चालवून घेतल्यास बंब तसेच आपत्ती काळात वापरली जाणारी अवजड वाहाने चालविण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे अग्निशमन दलाने हलकी वाहने चालविण्यासाठी कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता.या नियुक्तींचा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. ही नियुक्ती खासगी कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.

महत्त्वाची बातमी : तेंडुलकर पुन्हा दिसणार मैदानात; यंदाच्या IPL हंगामात मुंबई इंडियन्सच लावणार बोली?

अग्निशमन दलाच्या पुर्णवेळ चालकांना वेतन आयोगानुसार वेतन असते. त्यात त्यांचा ओव्हरटाईम आणि इतर भत्यांमुळे वेतन वाढते. तसेच, त्यांना वैद्यकिय, अपघात सुविधाही पुरवल्या जातात. या सर्व खर्चाला कात्री लावण्यासाठी अग्निशमन दल हे पाऊल उचलत असल्याची शक्यता आहे. मात्र, अग्निशमन दलाचे चालकही आपत्तीच्या ठिकाणी स्वत:चा जिव धोक्यात घालून काम करत असतात, त्यामुळे या कंत्राटी चालकांना कोणत्या सुविधा मिळणार असा प्रश्‍नही आहेच.

कंत्राटीकरणाकडे वाटचाल

बेस्टने कंत्राटी बसेस घेतल्याचा वाद सध्या सुरु आहे. यापुर्वी महानगर पालिकेने अनेक कार्यालयात ‘हाऊस किंपींग’च्या नावाखाली कंत्राटी भरती सुरु केली आहे. महापालिका मुख्यालयातही कंत्राटी ‘हाऊस किपींग’कामगार नियुक्त केले आहेत. त्याबरोबर उपनगरात सुरु होणाऱ्या नव्या वैद्यकिय अभ्यासक्रमासाठीही कंत्राटी वैद्यकिय प्राध्यापक नियुक्त करण्यात येणार असल्याची घोेषणा अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली आहे. तसेच,रुग्णालयातील कारकुनांच्या जागा भरुन काढण्यासाठी कंत्राटी भरती करण्यासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत. तर, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कंत्राटी सफाई कामगार नियुक्त केले आहे.

recruitment of drivers by contract method privatization in mumbai fire brigade

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT