lightning 
मुंबई

वीज पडण्याचा धोका कमी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात उभारण्यात येणार वीज प्रतिरोधक यंत्रणा

राहुल क्षीरसागर

ठाणे : पावसाच्या कालावधीत अनेकदा वीज पडून माणसांसह जनावरांचा देखील बळी जात आहे. तर, अनेकदा परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती ओढवली जात असते. याची गांभीर्याने दाखल घेत, शासनाच्या सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यात 365 ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्र (लायटनिंग अरेस्टर) बसविण्यात येणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत ही योजना आखण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

ठाणे जिल्ह्यात चक्रीवादळ प्रभावी क्षेत्रात येत असल्याने या वादळांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. भूमिगत विद्युतीकरण, किनारपट्टीलगत झाडांची लागवड अशा योजना राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत आहेत. वीज प्रतिरोधक यंत्रणा हा देखील याचाच एक भाग आहे. यंदा आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान व निष्पाप जीव गेल्यानंतर शासनाकडून कोकण किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत वीज प्रतिरोधक यंत्रणा (लायटनिंग अरेस्टर) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्‍यांमध्ये 365 ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा (लायटनिंग अरेस्टर) उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. 

दरम्यान, वीज पडण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसवण्यासाठी अल्प स्वरूपात खर्च येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालये, बस स्थानक अशा ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यासाठी 50 हजारांची खर्चाची मर्यादा देखील देण्यात आली आहे. तर, रस्त्याच्या कडेला व शासकीय जागेत निवारा बांधून त्यावर यंत्रणा उभारण्यासाठी 5 लाखापर्यंतची मर्यादा असणार आहे. तसेच ही यंत्रणा उभारल्यानंतर या परिसरात वीज कोसळली, तरी वीज प्रतिरोधक यंत्रणा आपल्याकडे वीज खेचून घेईल, त्यानंतर त्या प्रणालीच्या माध्यमातून जमिनीमध्ये वीज प्रवाह वळवला जातो. त्यामुळे वीज पडण्याच्या घटना कमी होऊन नुकसान टाळता येणे शक्‍य होणार आहे. 

ही योजना प्राथमिक पातळीवर आहे. या संदर्भात अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानुसार निवड होणाऱ्या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. मोठया इमारती, कारखाने, मोबाइल टॉवर अशा ठिकाणी अशी यंत्रणा बसवलेल्या असतात. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत ही यंत्रणा जीथे वारंवार वीज पडून दुर्घटना घडते. तसेच गर्दीची ठिकाणे, संवेदनशील विद्युत, संपर्क केंद्रे, शासकीय कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, पोलिस स्टेशन अशा विस्तृत परिसरात बसवली जाणार आहे. 
- अनिता जवंजाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे. 

7 तालुक्‍यात उभारणार वीज प्रतिरोधक यंत्रणा 

तालुका ठिकाणे - संख्या 
* ठाणे - 38 
* कल्याण - 16 
* भिवंडी - 09 
* अंबरनाथ - 34 
* उल्हासनगर - 13 
* मुरबाड - 126 
* शहापूर - 127 

(संपादन : वैभव गाटे)

to reduce lightning strike an electrical resistance system will be set up in thane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT