मुंबई

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार एक महिन्याचा जादा पगार

सकाळवृत्तसेवा

मुंबई : रिलायन्सतर्फे चालवल्या जाणाऱ्या दोन रुग्णालयांत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष वेतन देऊन गौरवले जाणार आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरंग ज्ञानचंदानी यांनी ही घोषणा केली. 

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 100 खाटांचे विशेष रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. एचएन रिलायन्स फाऊंडेशनच्या गिरगाव येथील रुग्णालयातही कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू आहे. तेथील डॉक्‍टर व अन्य कर्मचाऱ्यांना अथक कामाबद्दल एक महिन्याचे जादा वेतन देण्यात येईल.

या दोन्ही रुग्णालयांतील विलगीकरण कक्षांतील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या जादा वेतनाखेरीज बक्षीस देण्यात येईल. तेथील निवासस्थानांत न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा शिधा दिला जाणार आहे. 

या कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुरक्षा उपकरणे दिली जातील. गिरगावमधील रुग्णालयापर्यंत येण्या-जाण्यासाठी विनाशुल्क बससेवा, प्रवासादरम्यान पाणी, बिस्किटे व मास्क आदी सुविधा देण्यात येतील. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दररोज जेवणही देण्यात येईल.

कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची बाधा वा अन्य आजार झाल्यास रुग्णालयातच वैद्यकीय मदत व तिचा खर्चही दिला जाईल. या विशेष साहाय्याबद्दल रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलने रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचे आभार मानले आहेत.

reliance to give extra wages for doctors and health workers working in their hospitals

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Statement : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, खात्यांचा पदभार सोपवला

IND U19 vs SL U19 SF Live: भारत-श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोण जाईल फायनलला? बांगलादेशकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Success Story: रामटेकच्या कार्तिक बावनकुळेचा युपीएससीत डंका; आयआयटी जमले नाही, युपीएससीला घातली गवसणी

SCROLL FOR NEXT