ठाणे ः टॅंकरमुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा. 
मुंबई

ठाण्यात पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावते. पाण्यासाठी गावांना ग्रामसभेचा ठराव घेऊन त्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा लागतो; मात्र सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामसभा घेणे शक्‍य नसल्याने सरकारने ग्रामसभा घेण्याची अट शिथिल केली आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या ठरावाऐवजी ग्रामपंचायतीचा ठराव अथवा संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या पत्राआधारे टंचाई घोषित करून टॅंकर देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. 

ठाणे जिल्ह्यात ज्या गावांत पाणीटंचाईची समस्या आहे, त्या गावातील सरपंच व ग्रामसेवक ग्रामसभा घेऊन त्या गावातील लोकसंख्या व तेथील परस्थितीची माहिती असलेला ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठवतात. त्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी पाहणी करून त्या ठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जातो; मात्र "कोरोना'मुळे ग्रामसभेच्या ठरावाची अट सध्याच्या टंचाई कालावधीसाठी सरकारने शिथिल केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. 

गावपाड्यांवर टंचाईजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामसभा न घेता, केवळ त्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवल्यास पाणीटंचाईची समस्या सोडवता येणार आहे. 
एच. एल. भस्मे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, ठाणे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT