संग्रहित छायाचित्र 
मुंबई

प्रवाशांना दिलासा : पश्‍चिम रेल्वेचा 134 कोटींचा परतावा 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या असल्या तरी प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आरक्षणाच्या तिकिटांचा पश्‍चिम रेल्वेकडून परतावा दिला जात आहे. 1 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत पश्‍चिम रेल्वेच्या संपूर्ण विभागात एकूण 21 लाख 23 हजार प्रवाशांना 134 कोटी 48 लाख रुपयांचा तिकीट परतावा देण्यात आला आहे. एकट्या मुंबई विभागातून 9 लाख प्रवाशांना 63 कोटी रुपयांचा परतावा दिला गेला आहे. 

कोरोना संसर्गामुळे प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रद्द झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांनी दोन-तीन महिन्याअगोदर काढलेले तिकीट पश्‍चिम रेल्वेकडून रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे पश्‍चिम रेल्वेकडून परत केले जात आहेत. 

1 मार्च ते 4 एप्रिल कालावधीत पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण 9 लाख 35 हजार 509 प्रवाशांनी तिकीट रद्द केले आहे. त्यानुसार पश्‍चिम रेल्वेने 63 कोटी 48 लाख रुपये प्रवाशांना परतावा दिला आहे. 1 ते 31 मार्चपर्यंत 9 लाख 23 हजार 645 प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. त्यातून 62 कोटी 49 लाख रुपये परतावा देण्यात आला. मागील 4 दिवसांत 11 हजार 864 प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. त्यातून 98 लाख 24 हजार रुपये परतावा देण्यात आला आहे, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

4 दिवसांत 2 कोटी 23 लाखांचा परतावा 
1 ते 31 मार्च कालावधीत 20 लाख 96 हजार प्रवाशांचा प्रवास रद्द झाला आहे. परिणामी पश्‍चिम रेल्वेने प्रवाशांना 132 कोटी 25 लाख रुपयांचा तिकीट परतावा दिला आहे. मागील 4 दिवसांत 22 हजार 427 प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. त्यातून 2 कोटी 23 लाख रुपये परतावा देण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT