मुंबई

KEM, नायरमध्ये निवासी डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह; मुंबईत 79 नवे रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

मुंबई : केईएम रुग्णालयातील सहायक वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याच्यावर तेथेच उपचार सुरू करण्यात आले आहेत. नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने एका निवासी डॉक्‍टरला लागण झाली. या डॉक्‍टरला कोविड-19 वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. 

महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील सहायक वैद्यकीय अधिकारी कार्यालयीन कामकाज पाहत होते. त्यामुळे त्यांचा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांशी संपर्क येत होता. त्यातूनच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी ताप आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील इतर डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून, तपासणी करण्यात येत आहे. 

महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या डॉक्‍टरांची थ्रोट स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक निवासी डॉक्‍टराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या चार निवासी डॉक्‍टरांची चाचणी घेण्यात आली. या चौघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

मुंबईत 79 नवे रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू 

मुंबईत गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 79 नवे रुग्ण सापडल्यामुळे बधितांची संख्या 775 वर गेली आहे. गुरुवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे बळींचा आकडा 54 झाला आहे. सहा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, आतापर्यंत 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या 79 नव्या रुग्णांपैकी बहुतेक जण मध्यमवर्गीय व झोपडपट्टी परिसरातील असल्याचे समजते. मृतांपैकी अनेक जणांना दीर्घकालीन आजार असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या पथकांनी आतापर्यंत 15 लाख व्यक्तींचे सर्वेक्षण केले. अति जोखमीच्या सहवासितांचा शोध घेऊन चाचणी करण्यात आली. पाच पथकांनी घरोघरी जाऊन कोरोना चाचणीसाठी 15 हजार नमुने गोळा केले. 

प्रतिबंधित क्षेत्रात कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी आठवडाभरात 40 विशेष दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. या दवाखान्यांत 1588 जणांची तपासणी करण्यात आली आणि त्यांच्यापैकी 442 संशयित रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले.

resident doctor detected positive in KEM and nair hospital 79 new corona positive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Rate: पेट्रोलियम मंत्र्यांच्या मोठ्या माहितीनंतर आजचे अपडेटेड दर जाहीर! मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Tukoba Palkhi : तुकोबारायांच्या पालखीमुळे वाहतुकीत बदल

Hinjewadi Issues : आयटीयन्‍सची वाट बिकट! नाल्‍यांची दुरुस्ती, रुंदीकरण अपूर्ण; हिंजवडीतील समस्‍या अजूनही ‘जैसे थे’

Chhatrapati Sambhajinagar: विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी बादली; डोनवाडा जि. प. शाळेला गळती; वर्गात साचलेले पाणी उपसण्याची वेळ

Mumbai Heavy Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; वरळी, दादर, सायन, लोअर परळसह अनेक भाग जलमय, मध्य रेल्वे उशिराने

SCROLL FOR NEXT