मुंबई

आपली लोकल कधी सुरू होणार? राज्य सरकारने सुरू केले प्रयत्न! वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक सेवा ठप्प आहे. त्यातच लोकल सेवाही बंद आहे. मुंबईतल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर जाण्यासाठी लोकल सेवा हा एकच पर्याय आहे. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरु केल्यात. अत्यावश्यक सेवेतील कामगारांची ने-आण करण्यासाठी लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं केली आहे. 

अनलॉक 1.0 अंतर्गत मुंबईसह राज्यभरात दुकानं आणि खाजगी कार्यालय सुरू करण्यात आली. मात्र त्यानंतर आता मुंबईत नागरिकांची पुन्हा गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक जण कामावर जाण्यासाठी बेस्ट बसचा वापर करताहेत. त्यामुळं गर्दी झाल्यास कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यात कोरोनाचा धोका हा गर्दीच्या ठिकाणी अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केंद्राकडे मागणी केल्याचं समजतंय. 

याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला राज्य सरकारनं पत्र लिहिलं आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांना एसटीनं प्रवास करणंही कठिण जात आहे. एसटीपेक्षा रेल्वेनं लवकर कामाच्या ठिकाणी पोहोचणं शक्य होतं. त्यामुळं रेल्वे मंत्रालयानं लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. आम्ही रेल्वे मंत्रालयाच्या संपर्कात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही लोकल सेवा सुरु व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत. किमान अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी तरी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, यासाठी हा प्रयत्न असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार येथून मुंबईत कामावर येणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही या भागात मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळं या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईत कामावर येण्यासाठी ज्यादा एसटी सोडण्यात येणार असल्याची माहितीही परब यांनी दिली. 

राज्य सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे. या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळं बस आणि एसटीमध्ये निम्म्याच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत दिसत आहे. म्हणूनच एसटी आणि बसची सेवा अपुऱ्या पडत असल्याने राज्य सरकारने लोकल सेवा सुरू करण्यासाठी केंद्राकडं मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT