mithibai college 
मुंबई

निर्णयाचा फेरविचार करा; उच्च न्यायालयाचा मिठीबाई महाविद्यालयाला आदेश...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : स्वायत्त दर्जा असलेल्या मिठीबाई महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसाठी किमान 70 टक्के हजेरी बंधनकारक केली आहे. या नियमाची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याविरोधात काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकादार विद्यार्थ्यांचे चौथ्या सत्रात हजेरीचे प्रमाण 58.9 टक्के आहे. या याचिकेवर न्या. एस. जे. काथावाला आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. 

विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाने गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास मनाई केली होती. या निर्णयाचा फेरविचार करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.

महाविद्यालयाने 59 टक्के हजेरी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी दिली आहे. पहिल्या सत्रात किमान 60 टक्के हजेरी सक्तीची करण्यात आली होती; ती 70 टक्के करण्यात आली, असेही सांगण्यात आले. 

उच्च न्यायालयाने या मुद्दयांची दखल घेत मिठीबाई महाविद्यालयाच्या भूमिकेबाबत असमाधान व्यक्त केले. महाविद्यालयाने या निर्णयावर फेरविचार करावा. हा प्रश्न महाविद्यालयाच्या शिस्तीप्रमाणे  विद्यार्थ्यांच्या भविष्याचाही आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. याचिकेवर पुढील सुनावणी 29 जूनला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

Vilas Chavan Success Story : दगड फोडणाऱ्या हातांनी घडवला 'साहेब'; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची MIDC अभियंता पदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

Konkan Holi Festival : एकमेकांच्या अंगावर फेकली जातात जळती लाकडे, होळीला रंगते देव-दानव युद्ध ! कोकणातील 'या' गावात शेकडो वर्षांची परंपरा

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

SCROLL FOR NEXT