rhea sushant 
मुंबई

रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात मुंबई पोलिसात दाखल केली तक्रार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करताना ड्रग्जचे धागेदोरे मिळाल्यानं एनसीबीसुद्धा चौकशी करत आहे. यामध्ये रियाचा भाऊ शौविकसह दोघांना अटकही करण्यात आली आहे. आता रियाने सुशांतची बहीण प्रियांकासह इतर काही लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रियाने मुंबई पोलिसांना या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. 

रियाने सुशांतची बहीण प्रियांका सिंह आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यासह इतर लोकांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन तयार केल्याबद्दल तिने ही तक्रार दिली आहे. रियाने फसवणूक, एनडीपीएस अॅक्ट आणि टेली मेडिसिन प्रक्टिस गाइडलाइन्स 2020 अंतर्गत त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. 

याबाबत रियाचे वकील सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जूनला सुशांत सिंह राजपूतला त्याची बहीण प्रियांका सिंह हिने राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन पाठवलं होतं. त्यामध्ये अशा औषधांचा समावेश होता जी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत येतात आणि त्यांच्यावर बंदी आहे. 

प्रियांका सिंहने पाठवलेल्या या प्रिस्क्रिप्शनवरूनच सुशांत आणि रिया यांच्यात वाद झाल्याचं रियाच्या वकिलांनी म्हटलं आहे. त्याची बहीण प्रियांकाने दिल्लीतून मेसेज पाठवला की, हे प्रिस्क्रिप्शन आहे. जेव्हा प्रिस्क्रिप्शन पाहिलं तेव्हा ते डॉक्टरांनी पाहिलं नसल्याचं दिसलं. याबाबत चर्चा झाली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राज्यमंत्र्याच्या सख्ख्या भावाला गांजा तस्करी प्रकरणी अटक; ४६ किलो गांजासह रंगेहाथ पकडलं

'स्टार' असल्यानं अपेक्षा वाढतात! सोशल मीडियापासून दूर राहणारी ऐश्वर्या पहिल्यांदा बोलली, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत

Gold Rate Today : सोने सलग दुसऱ्या दिवशी महागले, चांदीनेही गाठला उच्चांक; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव

IPL Auction 2026 : मोठा ट्विस्ट! १३५५ पैकी १००५ खेळाडू लिलावापूर्वीच झाले OUT; स्टार खेळाडूसह ३५ जणांची शेवटच्या क्षणी एन्ट्री

SCROLL FOR NEXT