मुंबई

ड्रग्स प्रकरणः रिया, शौविकची मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव

- सुनीता महामुणकर

मुंबई : सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात अंमलीपदार्थ संबंधामध्ये अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी आज अर्ज दाखल केला. विशेष एनडीपीएस कोर्टाने तिच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

सुशांतला अंमलीपदार्थ दिले आणि त्याच्यासाठी ड्रग विक्रेत्यांकडून खरेदी केले, असा आरोप अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने रियावर ठेवला आहे. याबाबत तिने तपास अधिकाऱ्यांकडे जबाब नोंदविल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र रियाच्यावतीने याचे खंडन करण्यात आले आहे. राजकीय आकसाने माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत आणि पोलिसांनी दबावाखाली जबाब घेतला आहे, असे रियाच्या वतीने दाखल अर्जामध्ये म्हटले आहे. 

अन्य आरोपींनी रियाचा उल्लेख त्यांच्या जबाबात केला आहे. शौविकलाही पोलिसांनी ड्रग प्रकरणात अटक केली आहे. दोघांच्या वतीने एड सतीश मानेशिंदे यांनी आज अर्ज दाखल केला. अर्जावर  23 तारखेला न्या सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. 

याप्रकरणातील अन्य आरोपींनीही जामीनासाठी अर्ज केला आहे. यामध्ये झैद विलात्रा, बसित परिहार, दिपेश सावंत आदींचा समावेश आहे. सुशांतने14  जून रोजी आत्महत्या केली होती. याबाबत सीबीआय, ईडी आणि एनसीबी तपास करीत आहेत. विशेष एनडीपीएस न्यायालयाने मागील आठवड्यात सर्व आरोपींचा जामीन फेटाळला आहे.

-------------------

(संपादनः पूजा विचारे)

Rhea Chakraborty judicial custody extended till October 6 by special NDPS court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT