sachin at sevenhills 
मुंबई

कोरोना विजेत्यांना सचिन तेंडुलकरने केले आवाहन; काय म्हणाला सचिन वाचा सविस्तर... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारावर सध्या कोणतेही ठोस औषधोपचार किंवा लस उपलब्ध नाही. त्यासाठी जगभरात कोरोनावरील औषधासाठी संशोधन सुरु आहे. मात्र, कोरोनावर मात करण्यासाठी सर्वात महत्वाची ठरली ती रुग्णांची प्रतिकारशक्ती. अनेक रुग्ण प्रतिकारशक्तीमुळे कोरोनातून बरेही झाले. अशा कोव्हिड विजेत्यांच्या प्लाझ्माचा वापर करून अत्यवस्थ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी केली जात आहे. त्याचेही परिणाम चांगले दिसत आहे. त्यामुळे अनेक कोव्हिड विजेत्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे. 

तुम्ही कोरोनाला हरवून यशस्वीपणे घरी परतलात, आता प्लाझ्मा थेरपीसाठी पुढे या! असे आवाहन मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कोव्हिड विजेत्यांना केले. गंभीर कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी थेरपी गुणकारी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पालिकेच्या सेव्हनहिल रुग्णालयात आज सचिनच्या उपस्थितीत प्लाझ्मा थेपरी सुरु करण्यात आली.

'आयसीएमआर'च्या परवानगीनुसार पालिकेच्या नायर, शीव, केईएम, कस्तुरबा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रुग्ण कोरोनामुक्त झाल्यावर ठराविक दिवस झाल्यानंतर त्याच्या रक्तातून प्रतिपिंडे मिळवण्यात येतात. प्रतिपिंडात तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे कोरोनाला रोखता येते. मात्र यासाठी कोरोमुक्त झालेल्या रुग्णांनी अँटीबॉडी दान करण्यासाठी स्वत:हून पुढे येणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेकडून कोरोनामुक्त झालेल्यांना आवाहन करण्यात येत आहे. 

प्लाझ्मा थेरपी गुणकारी असली, तरी प्लाझ्मा दान करण्यासाठी कोव्हिड विजेत्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. जेव्हढे कोव्हिड विजेते पुढे येतील तेवढा लाभ बाधित रुग्णांना होणार आहे. पालिकेने आपल्या रुग्णालयांत सुरू केलेल्या प्लाझ्मा थेरपीला येत असलेले यश पाहून पालिकेच्या अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयातही प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

Latest Marathi Update : भाजपकडून बाहेरून गुंड पाठवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न : अभिजीत दिपके

Auto Rickshaw Driver Killed : गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव! गिरगाव डोंगरात रिक्षा चालकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

Pune News: बारामतीत माणुसकीचे दर्शन! रस्त्यात अपघात पाहताच सुनेत्रा पवार थांबल्या; जखमी तरुणीला तत्काळ रुग्णालयात केलं दाखल

SCROLL FOR NEXT