मुंबई

NIA ने जप्त केली आणखी एक मर्सिडीझ कार, सचिन वाझे प्रकरणात नवा ट्विस्ट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सचिन वाझे प्रकरणासंदर्भात आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. आज केंद्रीय तपास यंत्रणांकडून आणखी एक मर्सिडीझ गाडी जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही गाडीही सचिन वाझे वापरात असल्याचं मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समजतंय.

याआधी देखील एक मर्सिडीझ गाडी NIA ने ताब्यात घेतलेली होती. ज्या गाडीतून दोन हजाराच्या नोटांचे बंडल, नोटा मोजण्याचं मशीन, काही नंबर प्लेट्स, दारूची बाटली अशा गोष्टी सापडल्या होत्या. दरम्यानात, आज जप्त करण्यात आलेल्या मर्सिडीझ गाडीची फॉरेन्सिक तपासणी देखील होऊ शकते असं देखील समजतं आहे. याआधी जप्त केलेल्या मर्सिडीझची तपासणी सुरु असताना आता आणखी एक गाडी NIA ने जप्त केलेली आहे. 

माध्यमांच्या माहितीनुसार सध्या NIA कडून एकूण चार गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एक लँड क्रुझर गाडी, एक इनोव्हा गाडी, या आधी सचिन वाझे वापरत असलेली एक मर्सिडीझ गाडी आणि आज आणखी एक मर्सिडीझ गाडी जप्त केली गेली आहे.  या सर्व गाड्यांची NIA चे अधिकारी पुन्हा तपासणी करणार असल्याचंही समजतंय. 

दरम्यान, काल वाझेंच्या निवासस्थानातून जप्त करण्यात आलेली लँड क्रुझर गाडी आणि आज ताब्यात घेण्यात आलेल्या मर्सिडिझमधून मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात नवीन काय माहिती हाती लागते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

sachin vaaze case NIA seized one more mercedes  benz car and investigation is on


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT