mulund 
मुंबई

काय सांगता ! मुंबईतील 'ही' 2 शहरं कोरोनापासून सर्वात सुरक्षित, वाचा

सकाळवृत्तसेवा

मुंबई  : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत आहे, पण मुंबईतील सर्वच भागात हे घडत नाही. बोरीवली पश्चिम, मुलुंड तसेच मरिन लाईन्स, काळबादेवी, चित्रा बाजार परिसरात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी आहे. 

आर उत्तर अर्थात बोरीवली असलेल्या प्रभागात कोरोना रुग्णांची संख्या सगळ्यात कमी म्हणजे 29 आहे, तर मुलुंड असलेल्या टी प्रभागात 32 तर दक्षिण मुंबईतील क प्रभागात 33 जण आहेत. या तीनही प्रभागातही झोपडपट्टी किंवा चाळी आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत, तरीही रुग्णांची संख्या कमी आहे. वोरीवली असलेल्या आर उत्तर प्रभागातील 60 टक्के भागात झोपडपट्टी आहे. दक्षिण मुंबईतील क प्रभागात 41 टक्के जुन्या चाळी आहेत.  तर टी प्रभागात 35 टक्के झोपडपट्टी आहे. त्यानंतरही या प्रभागात कोरोनाची साथ आटोक्यात राहण्यात यश आले आहे. या प्रभागातील रुग्ण काही कुटुंबापुरते मर्यादीत आहेत. या तीनही प्रभागात एकच हॉटस्पॉट आहे. 

या प्रभागांनी कंटनमेंट, विलगीकरण, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, स्वच्छतागृह तसेच झोपडपट्ट्यांचे डिसइनफेक्शन, हे सर्व उपाय काटेकोरपणे अमलात आणले. त्यांनी कोरोनाची साथ पसरणार नाही याकडे लक्ष दिले. आर उत्तर प्रभागातील बहुतेक रुग्ण तीन झोपडपट्टीतील आहेत. त्यांचे विलगीकरण रुग्णालयात वेळीच झाल्याने साथ पसरली नाही. क प्रभागातील साथही कुटुंबापुरती किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींपुरतीच प्रामुख्याने मर्यादीत राहिली. टी प्रभागातही काहीसे हेच घडले, पण या प्रभागात एका भाजीविक्रेत्यास कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर परिसरातील पदपथांवर भाजी तसेच फळांची विक्री पूर्ण बंद करण्यात आली. या सर्व प्रभागांनी स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिल्याचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत.

This is the safest city in Mumbai, read on

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT